“प्लीज मोदीजी…” म्हणणाऱ्या जम्मूच्या चिमुरडीच्या शाळेचा कायाकल्प व्हायला सुरुवात, पंतप्रधानांना केलेल्या विनंतीनंतर प्रशासकीय घडामोडींना वेग

प्रतिनिधी

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील इयत्ता तिसरीच्या विद्यार्थिनीचा तिच्या शाळेत मूलभूत सुविधा सुनिश्चित करण्याशी संबंधित एक व्हिडिओ संदेश व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये सीरत नाजने स्वतःची ओळख करून देताना पंतप्रधान मोदींना सांगितले होते की, तिच्या शाळेत मूलभूत सुविधा नाहीत. विनंती करताना सीरत म्हणाली होती की, प्लीज मोदीजी, तुम्ही सर्वांचे बोलणे ऐकतात, माझेही ऐका. आमच्या शाळेत खूप घाण आहे, आमचे कपडे घाण होतात, माझी आई मला मारते. कृपया चांगली शाळा बांधून द्या ना. पंतप्रधानांना केलेल्या या विनंतीनंतर आता जम्मू-काश्मीर प्रशासनाने सैराटच्या शाळेला नवे रूप देण्याचे काम सुरू केले आहे.Rejuvenation begins at Jammu’s school for a girl who video went viral, Administrative developments speed up after plea to PM

जम्मूचे शालेय शिक्षण संचालक रविशंकर शर्मा यांनी लोहाई-मल्हार ब्लॉकमध्ये असलेल्या सीरत नाजच्या शाळेला भेट दिली. शाळेला भेट दिल्यानंतर शर्मा म्हणाले की, शाळेला आधुनिक धर्तीवर अपग्रेड करण्यासाठी 91 लाख रुपयांचा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. मात्र प्रशासकीय मान्यतेबाबत काही अडचणींमुळे हे काम रखडले होते. आता ते सोडवण्यात आले असून काम सुरू आहे.



अधिकाऱ्याने सांगितले की, शेकडो शाळा केंद्रशासित प्रदेशाच्या दुर्गम भागात सुरू आहेत आणि या सर्व शाळांमध्ये योग्य आणि आधुनिक सुविधा सुनिश्चित करण्यासाठी सरकारने आधीच तपशीलवार प्रकल्प तयार केला आहे.

“आम्ही जम्मू प्रांतातील सर्व जिल्ह्यांमध्ये 1,000 नवीन बालवाड्यांचे बांधकाम सुरू केले आहे आणि येत्या तीन ते चार वर्षांत, आम्ही प्रत्येक 10 जिल्ह्यांमध्ये 250 बालवाड्यांचे बांधकाम सुनिश्चित करू.”

भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) अधिकारी बनण्याची आकांक्षा असलेल्या नाझने सांगितले की, तिच्या संदेशाला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने तिला आनंद झाला आहे. नाझ म्हणाली, “मी स्वतः पंतप्रधानांसोबत माझे विचार मांडण्यासाठी व्हिडिओ बनवला होता. मला आनंद आहे की, काम होत आहे, आमच्या शाळेला नवीन रूप मिळत आहे.”

Rejuvenation begins at Jammu’s school for a girl who video went viral, Administrative developments speed up after plea to PM

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात