प्रतिनिधी
मुंबई : सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्सने (CISF) एक अधिसूचना जारी करुन पदासाठी भरतीची घोषणा केली आहे. अधिसूचनेनुसार, Central Industrial Security Force मध्ये 451 काॅन्स्टेबल/ड्रायव्हर कम पंप ऑपरेटर पदांची भरती केली जाणार आहे. ज्यासाठी अर्ज प्रक्रिया लवकरच सुरु होईल. 23 जानेवारी 2023 पासून उमेदवार या भरती मोहिमेसाठी अर्ज करु शकतील. इच्छुक उमेदवारांना अधिकृत वेबसाईट WWW.cisfrectt.in द्वारे ऑनलाईन अर्ज करावा लागेल. या मोहिमेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 फेब्रुवारी निश्चित करण्यात आली आहे. : Recruitment of 451 posts in CISF; Apply
अधिसूचनेनुसार, 451 रिक्त जागा भरण्यासाठी ही भारती मोहिम आयोजित केली जात आहे. त्यापैकी 183 रिक्त जागा काॅन्स्टेबल/ ड्रायव्हर आणि 268 रिक्त जागा काॅन्स्टेबल/ ड्रायव्हर कम पंप ऑपरेटर पदांसाठी आहेत.
शैक्षणिक पात्रता
भरतीसाठी अर्ज करणा-या उमेदवारांनी केंद्र किंवा राज्य सरकारद्वारे मान्यता प्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून मॅट्रिक किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
वयोमर्यादा
या भरतीसाठी अर्ज करणा-या उमेदवारांचे वय 21 ते 27 वर्षे दरम्यान असावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
रिक्त जागांवर अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाईटला भेट देऊन 22 फेब्रुवारीपूर्वी अर्ज करावा लागेल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App