विक्रमी मतदान करा, पहिल्या टप्प्यातले मतदान सुरू होताना मोदींचे मराठीसह तमिळ, बंगाली भाषेत आवाहन

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीला आजपासून सुरुवात होत आहे. 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 102 जागांसाठी मतदान होत असल्याने, या जागांसाठी मतदान करणाऱ्या सर्वांनी विक्रमी संख्येने मतदान करावं असं मी आवाहन करतो. विशेषतः तरुण आणि प्रथमच मतदान करणाऱ्या मतदारांना मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं मी आवाहन करतो. शेवटी, प्रत्येक मत मोजले जाते आणि प्रत्येक आवाज महत्त्वाचा असतो, असे आवाहन करणारे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.Record vote, Modi’s appeal in Tamil, Bengali along with Marathi as the first phase of voting begins

देशातील पहिल्या टप्प्यामधील मतदान आज पार पडत आहे. पहिल्या टप्प्यामध्ये देशातील 21 राज्यांमधील 102 जागांसाठी मतदान सकाळी 7.00 वाजल्यापासून सुरु झाले असून यात विदर्भातील नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे.



नागपूरमध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान पंतप्रधान मोदींनी आज महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर अगदी मराठीमधून मतदारांना विशेष आवाहन केलं आहे.

पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले?

पंतप्रधान मोदींनी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर काही वेळामध्येच आपल्या अधिकृत एक्स (आधीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन मराठीत एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मतदारांना विक्रमी संख्येनं मतदान करण्याचं आवाहन पंतप्रधांनी केलं आहे. “2024 च्या लोकसभा निवडणुकीला आजपासून सुरुवात! 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 102 जागांसाठी मतदान होत असल्याने, या जागांसाठी मतदान करणाऱ्या सर्वांनी विक्रमी संख्येनं मतदान करावं असं मी आवाहन करतो. विशेषतः तरुण आणि प्रथमच मतदान करणाऱ्या मतदारांना मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं मी आवाहन करतो. शेवटी, प्रत्येक मत मोजले जाते आणि प्रत्येक आवाज महत्त्वाचा असतो,” असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

इतरही भाषांमध्ये पोस्ट

मराठी बरोबरच पंतप्रधान मोदींनी हिंदी, इंग्रजीमध्येही आपल्या एक्स अकाऊंटवरुन पोस्ट केली आहे. त्याचप्रमाणे पंतप्रधानांनी बंगाली, तमीळसहीत इतरही प्रादेशिक भाषांमध्ये नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

आज नागपूरमधून निवडणूक लढणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींबरोबरच एकूण पाच मतदारसंघांमध्ये विकास ठाकरे, सुधीर मुनगंटीवार, प्रतिभा धानोरकर यासारख्या मोठ्या नेत्यांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे.

कसा आहे लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम?

यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये एकूण 97.6 कोटी मतदार मतदानासाठी पात्र आहेत. एकूण 44 दिवस निवडणुकीचा कार्यक्रम पार पडणार असून त्यात 7 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. शेवटच्या टप्प्याचे मतदान 1 जून रोजी होणार असून मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे. महाराष्ट्रामध्ये शेवटच्या टप्पा वगळता सर्वच टप्प्यांमध्ये मतदान पार पडणार आहे

Record vote, Modi’s appeal in Tamil, Bengali along with Marathi as the first phase of voting begins

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात