दिल्लीत गेल्या ४६ वर्षांतील विक्रमी पाऊस, पावसामुळे प्रचंड प्रमाणात पाणी


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीला प्रचंड पावसाचा तडाखा बसला आहे. अनेक भागांत पूर आल्यासारखी स्थिती आहे. गेल्या ४६ वर्षांतील विक्रमी पाऊस दिल्लीमध्ये झाला आहे. यापूर्वी १९७५ मध्ये इतकाच प्रचंड पाऊस झाला होता.Record rainfall in the last 46 years in Delhi, huge amount of water due to rains

नवी दिल्लीत पावसामुळे प्रचंड प्रमाणात पाणी साचले. यामुळे दिल्ली विमानतळावरील उड्डाणांवर परिणाम झाला. प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक विस्कळीत झाली आणि पूराचे पाणी शिरलेल्या भुयारी मार्गांतील वाहनांत प्रवासी अडकून पडले. ढगांचा गडगडाट आणि आकाशात चमकणाºया विजा अशा वातावरणातच दिल्लीकर शनिवारी सकाळी जागे झाले.



वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, पहाटे साडेपाच ते दुपारी अडीच या वेळेत शहरात ११७.९ मिलिमीटर पाऊस नोंदला गेला. या महिन्याच्या सुरुवातीला १ सप्टेंबरला ११२.१ मिमी व २ सप्टेंबरला ११.७ मिमी पावसाची नोंद शहरात झाली होती.

शनिवारी दुपारी दीड वाजेपर्यंत शहरात पाणी साचल्याच्या २६२ तक्रारी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक यंत्रणेकडे करण्यात आल्या. नरेला भागातील धोकादायक घोषित करण्यात आलेली एक जुनी इमारत पावसामुळे कोसळली, मात्र या घटनेत कुणीही जखमी झाले नाही.

दिल्ली विमानतळ परिसरात पाणी साचल्यामुळे स्पाइसजेटची दोन आणि इंडिगो व गो फर्स्टचे एक अशी ४ देशांतर्गत विमाने जयपूरला वळवण्यात आली; तर दुबईहून दिल्लीला येणारे एमिरेट्स कंपनीचे विमान अहमदाबादकडे वळवण्यात आले, अशी माहिती विमानतळाच्या अधिकाºयांनी दिली. तथापि, या परिसरात पाणी काही वेळच तुंबले. सकाळी ९ वाजेपासून येथून विमान वाहतूक सुरू झाली, असे दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लि. (डीआयएएल)ने सांगितले.

दिल्लीत या वर्षी आतापर्यंत ११०० मिलिमीटर इतका प्रचंड पाऊस झाला आहे. हा गेल्या ४६ वर्षांतील सर्वाधिक पाऊस आहे. शहरासाठी अधिकृत नोंद करणाºया सफदरजंग वेधशाळेने १९७५ च्या पावसाळ्यात ११५० मिलिमीटर पावसाची नोंद केली होती. या वर्षी पर्जन्यमान ११०० मिलिमीटर यापूर्वीच नोंदले गेले असून, मोसमी पावसाचा काळ अजून संपलेला नाही, असे हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Record rainfall in the last 46 years in Delhi, huge amount of water due to rains

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात