बँकांमधून 2000 च्या नोटा बदलून घेण्यासाठी वाचा ही नियमावली; मुदत 30 सप्टेंबर 2023 पर्यंत, घाईगर्दीची गरज नाही!!

वृत्तसंस्था

मुंबई : 23 मे 2023 पासून 2000 रुपयांच्या नोटा बँकांमधून बदलून घेता येणार आहेत. मात्र रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांच्या नोटा मागे घेतल्या असल्या तरी त्या बदलून घेण्यासाठी नागरिकांना पुरेशी वेळ दिली आहे. त्यामुळे धावपळ करून बँकांमध्ये घाई गर्दी करण्याची काहीच गरज नाही, असा स्पष्ट निर्वाळा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिला आहे. त्याचबरोबर 2000 रुपयांच्या नोटांच्या चलनाची वैधता रद्द झालेली नाही, याचीही आठवण त्यांनी करून दिली.Read these rules to exchange 2000 notes from banks; Deadline 30 September 2023, No need to rush!!

2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी नागरिकांना 30 सप्टेंबर 2023 पर्यंतची मुदत आहे. त्यामुळे घाई गर्दी न करता शांतपणे या नोटा टप्प्याटप्प्याने बदलून घेता येतील. त्याचे नियोजन करावे, असे आवाहन शक्तिकांत दास यांनी बँका आणि नागरिकांना केले आहे.


बँकांमधून आजपासून 2000 च्या नोटा मिळणार बदलून, पण धावपळीची गरज नाही; रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचा निर्वाळा


आरबीआयने नागरिकांमध्ये कोणत्याही प्रकारचे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी बरेच पर्याय उपलब्ध करुन दिले आहेत. तसेच याबाबत आरबीआयकडून कोणतेही निर्बंध घालण्यात आलेले नाहीत. आरबीआयने बँकांना नियम बनवण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. तसेच तुम्ही एका वेळी 2000 नोटा या 20000 रुपयांपर्यंत बदलू शकता. हे पैसे तुम्ही तुमच्या बँकेच्या खात्यात जमा करू शकता किंवा बँकेतून नोटा बदलून घेऊ शकता. त्यामुळे नागरिकांनी गोंधळून न जाण्याचे आवाहन रिझर्व्ह बँकेने केले आहे.

2000 च्या नोटा मागे घेणे हा नोटबंदीचा धक्का नव्हे; तर छोट्या करन्सी कडे जाण्याचा मार्ग!!

रिझर्व्ह बॅंक आता 2000 रुपयांच्या नोटा मागे घेणार आहे. पण त्या मागे घेण्याची घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 सप्टेंबर 2016 रोजी जो नोटबंदीचा धक्का दिला होता, तशा प्रकारचा हा धक्का नव्हे, तर रिझर्व बँकेचा देशाला छोट्या करन्सी कडे जाण्याचा हा मार्ग आहे, असे अनेक अर्थतज्ञांनी स्पष्ट केले आहे.

एकतर 2000 च्या नोटांची कायदेशीर वैधता सरकारने मागे घेतलेली नाही. किंवा त्या पूर्णपणे रद्दबातल ठरवलेल्या नाहीत, तर त्यांची मुद्रा कायदेशीर दृष्ट्या वैध ठेवून त्या नोटा मागे घेण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे.

8 सप्टेंबर 2016 रोजी पंतप्रधान मोदींनी चलनातल्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा पूर्णपणे रद्द ठरवल्या होत्या. त्या मुद्रा तत्काळ अवैध ठरवल्या होत्या. तसे 2000 रुपयांच्या नोटा मागे घेताना केलेले नाही. हा दोन निर्णयांमधला मूलभूत फरक आहे.

2016 नंतर ऑगस्ट 2022 पर्यंत 2000 रुपयांच्या बनावट नोटांमध्ये वाढ झाल्याचे उत्तर केंद्र सरकारने संसदेत दिले होते. ही पार्श्वभूमी देखील रिझर्व बँकेच्या आजच्या 2000 रुपयांच्या नोटा मागे घेण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरली आहे.

पण 8 सप्टेंबर 2016 रोजी जशी रात्री अचानक 8.00 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रीय ब्रॉडकास्ट करून नोटबंदीची घोषणा केली होती, त्या पद्धतीने 2000 रुपयांच्या नोटा मागे घेण्यात आलेल्या नाहीत, तर नोटा विशिष्ट मुदतीपर्यंत चालू ठेवून त्या नोटा बदलण्यासाठी सुमारे 4:15 महिन्यांची मुदत देऊन छोट्या करन्सी कडे पाऊल टाकण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतल्याचे स्पष्ट होत आहे.

बँका आणि नागरिकांसाठी सूचना

ज्या नागरिकांकडे 2000 रुपयांच्या नोटा आहेत, त्यांनी काय करावे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. रिझर्व्ह बँकेने या नागरिकांसाठी काही पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.

1. ज्यांच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा आहेत, ते नागरिक 2000 रुपयांच्या नोटा आपलूया बँक खात्यात जमा करू शकतात किंवा बँकेच्या शाखेत जाऊन इतर मूल्याच्या नोटा घेऊन बदलू शकतात.

2. 23 मे 2023 पासून 2000 रुपयांच्या नोटा 20000 रुपयांच्या मर्यादेपर्यंत बदलता येतील.

4. ज्यांच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा आहेत ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 2000 रुपयांची नोट बदलू शकतात.

5. तसेच RBI च्या 19 प्रादेशिक कार्यालयांमध्ये 20000 रुपयांच्या मर्यादेपर्यंत, 2000 रुपयांच्या नोटांची देवाणघेवाण करता येईल.

6. रिझर्व्ह बँकेने इतर बँकांना 2000 रुपयांच्या नोटा ग्राहकांना देणे बंद करावे, असे सांगितले आहे.

नोटा छपाई घटवली

मागील 3 वर्षात 2000 रुपयांची एकही नोट छापली नाही 2016-17 या आर्थिक वर्षात 2000 रुपयांच्या 35429.91 कोटी नोटा छापल्या होत्या. यानंतर 2017-18 मध्ये अत्यंत कमी 1115.07 कोटी नोटा छापल्या. त्यात आणखी कपात करुन 2018-19 मध्ये केवळ 466.90 कोटी नोटा छापण्यात आल्या. 2019-20, 2020-21 आणि 2021-22 या 3 आर्थिक वर्षांमध्ये 2000 रुपयांची एकही नोट छापलेली नाही. याचा अर्थ सरकारने आधीच 2000 च्या नोटा नियंत्रणात ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे.

Read these rules to exchange 2000 notes from banks; Deadline 30 September 2023, No need to rush!!

महत्वाच्या बातम्या 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात