रिझर्व्ह बँक 2000 रुपयांच्या नोटा मागे घेणार; 30 सप्टेंबर 2023 पर्यंत नोटा बदलून घेण्याची मुदत!!

  • सध्या अस्तित्वात असलेली मुद्रा वैधच; रिझर्व्ह बँकेचे स्पष्टीकरण

वृत्तसंस्था

मुंबई : रिझर्व्ह बँक आपल्या नवीन धोरणानुसार 2000 रुपयांच्या नोटा मागे घेणार असून ही मुद्रा वैध असल्याचे स्पष्टीकरण रिझर्व्ह बँकेने दिले आहे. सर्वसामान्य ग्राहकांसाठी 2000 रुपयांच्या नोटा बदलण्याची मूभा रिझर्व्ह बॅंकेने 30 सप्टेंबर 2023 पर्यंत ठेवली असून आपापल्या बँक खात्यांमधून या नोटा बदलून घेता येतील.RBI to withdraw Rs 2000 notes; Deadline to exchange notes till September 30, 2023!!

2000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्यात येतील अशा बातम्या मध्यंतरी आल्या होत्या.आता रिझर्व्ह बँकेने या संदर्भातला प्रत्यक्ष निर्णय घेतला आहे. त्यानुसार 2000 रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्यात येतील. पण ती मुद्रा वैधच असेल, असे स्पष्टीकरण रिझर्व्ह बँकेने दिले आहे.



त्याचबरोबर रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना एक महत्त्वपूर्ण सूचना केली असून त्यांनी 2000 रुपयांच्या नोटा ग्राहकांना देणे थांबवावे, असे स्पष्ट सांगितले आहे. त्याचबरोबर 2000 रुपयांच्या नोटा दुसऱ्या मूल्याच्या नोटांमध्ये रूपांतरीत करण्याची मर्यादा एकावेळी 20000 रुपयांची ठेवली आहे.

23 मे 2023 पासून नोटा बदलून देणे सुरू करून ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंत या नोटांचे एक्सचेंज पूर्ण करण्याच्या सूचनाही रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना दिल्या आहेत.

RBI to withdraw Rs 2000 notes; Deadline to exchange notes till September 30, 2023!!

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात