रवी किशन यांनी मल्लिकार्जुन खरगेंना दिला हिमालयात जाण्याचा सल्ला!

जाणून घ्या, नेमकं काय म्हणाले आहेत?


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : २०२४ च्या लोकसभा निवडणुका आता हळूहळू शेवटच्या टप्प्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचे मतदान गेल्या सोमवारी पूर्ण झाले. दरम्यान, निवडणूक प्रचारादरम्यान नेतेमंडळी एकमेकांविरोधात सातत्याने वक्तव्ये करत आहेत.Ravi Kishan advised Mallikarjun Khargen to go to Himalayas

नुकतेच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी एका सभेत भाजपचे सरकार परत आल्यास देशाला गुलाम बनवणार असल्याचे सांगितले. आता भाजप नेते आणि खासदार आणि गोरखपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रवी किशन यांनी मल्लिकार्जुन खरगे यांच्या विधानावर जोरदार हल्ला चढवला आहे.



काय म्हणाले खरगे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची तिसरी टर्म म्हणजे गरीब, दलित आणि आदिवासींना ‘गुलामांसारखी वागणूक’ असा दावा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी रविवारी केला. ते म्हणाले होते की, स्वातंत्र्यापूर्वी गरीब, दलित आणि आदिवासींना गुलामांसारखी वागणूक दिली जात होती. मोदी आणि शाहांना तिसरी टर्म दिल्यास तीच परिस्थिती पुन्हा येईल. आपण पुन्हा गुलाम होऊ.

खर्गे यांना हिमालयात जावे लागेल – रवि किशन

गोरखपूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रवी किशन म्हणाले, “यावरून वयाचा किती परिणाम होतो, हे लक्षात येते. माणूस म्हातारा झाला की, असे बोलतो. गेल्या 10 वर्षांपासून देश पाहत आहे की, ‘रामराज्य’मध्ये हिंदू आणि मुस्लीम सर्व आनंदी आहेत. आम्ही चंद्रावर पोहोचलो आहोत आणि ते म्हणताय, तुम्हाला लगेच विश्रांतीची गरज आहे, मी तुम्हाला त्या गुहेबद्दल सांगतो तिकडे जा मी पत्ता पाठवीन तिथे कसे जायचे.”

Ravi Kishan advised Mallikarjun Khargen to go to Himalayas

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub