लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात 67.25 टक्के मतदान, जाणून घ्या महाराष्ट्रात किती?

पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदान झाल्याची झाली आहे नोंद


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या 2024 चा चौथा टप्पा सोमवारी संपला. या टप्प्यात देशातील 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 96 जागांवर मतदान झाले. मतदानाच्या चौथ्या टप्प्यात लोकांनी उत्साहाने मतदान केले आणि 2019 च्या निवडणुकीच्या मतदानाच्या टक्केवारीला मागे टाकले.67.25 percent voting in the fourth phase of Lok Sabha elections know how much in Maharashtra

निवडणूक आयोगाने रात्री उशीरा शेअर केलेल्या निवडणुकीच्या आकडेवारीनुसार, चौथ्या टप्प्यात देशातील विविध लोकसभा जागांवर एकूण 67.25 टक्के मतदान झाले. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदान झाले. हे आकडे संभाव्य आहेत. निवडणूक आयोग काही दिवसांत नवीन आकडेवारी जाहीर करेल ज्यामध्ये मतदानाची टक्केवारी थोडी वाढू शकते.



2019 च्या निवडणुकीपेक्षा जास्त मतदान

लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या चौथ्या टप्प्यात 67.25 टक्के मतदान झाले, जे 2019 च्या निवडणुकीतील या टप्प्यापेक्षा 1.74 टक्के जास्त आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यानंतर 23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 379 जागांवर आतापर्यंत मतदान पूर्ण झाले आहे. आंध्र प्रदेश, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसाठीही मतदान पूर्ण झाले आहे.

कोणत्या राज्यात किती मतदान?

चौथ्या टप्प्यात तेलंगणाच्या सर्व 17, आंध्र प्रदेशच्या 25, उत्तर प्रदेशच्या 13, बिहारच्या पाच, झारखंडच्या चार, मध्य प्रदेशच्या आठ, महाराष्ट्राच्या 11, ओडिशाच्या चार, पश्चिम बंगालच्या आठ आणि आठ लोकसभेच्या जागांचा समावेश होता. जम्मू-काश्मीरच्या एका जागेवर मतदान झाले आहे. यामध्ये पश्चिम बंगाल 78.44 टक्के मतदानासह आघाडीवर आहे. आंध्र प्रदेशात 78.25 टक्के आणि ओडिशात ७३.९७ टक्के मतदान झाले. मध्य प्रदेशात 71.72 टक्के, बिहारमध्ये 57.06 टक्के, झारखंडमध्ये 65.31 टक्के, महाराष्ट्रात 59.64 टक्के, तेलंगणात 64.87 टक्के आणि उत्तर प्रदेशमध्ये 58.05 टक्के मतदान झाले. श्रीनगर, जम्मू आणि काश्मीरमध्ये 37.98 टक्के मतदान झाले, जे काही दशकांतील सर्वाधिक आहे.

पुढच्या टप्प्यातील निवडणुका कधी होणार?

लोकसभा निवडणूक 2024 चे 4 टप्पे पूर्ण झाले असून या सर्व टप्प्यांमध्ये अनुक्रमे 66.14 टक्के, 66.71 टक्के, 65.68 टक्के आणि 67.25 टक्के मतदान झाले आहे. देशात पुढील तीन टप्प्यांसाठी 20 मे, 25 मे आणि 1 जून रोजी मतदान होणार आहे. सर्व जागांसाठी 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे.

67.25 percent voting in the fourth phase of Lok Sabha elections know how much in Maharashtra

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात