राऊतांचे फक्त व्हिक्टिम कार्ड : सिंह गिधाडांना घाबरत नसतो; फडणवीसांचा पलटवार

प्रतिनिधी

पणजी : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालय लेखा टेडी चा कारवाईचा कायदेशीर फास आवळत चालला असताना संतापलेल्या खासदार संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना आम्ही तुमच्या घरात घुसले, तर नागपूरलाही जाता येणार नाही, असा इशारा दिला होता.Raut’s only victim card: Lion is not afraid of vultures; Fadnavis’s counterattack

संजय राऊत यांच्या इशाऱ्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रत्युत्तर दिले आहे. सिंह कधी गिधाडांच्या धमक्यांना घाबरत नाही, असे विधान करून फडणवीस यांनी राऊतांवर पलटवार केला आहे. त्याच वेळी त्यांनी संजय राऊत “व्हिक्टिम कार्ड” खेळत आहेत, असा टोलाही त्यांना लगावला आहे.



संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत फडणवीस यांच्यावर आरोप केले होते. त्यावर उत्तर देत देवेंद्र फडणवीस यांनी गोव्याच्या पत्रकार परिषदेत राऊतांवर निशाणा साधला आहे. राऊत “व्हिक्टि्म कार्ड” खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘शेर कभी गीदडों की धमकीयों से डरते नहीं!’, असे फडणवीसांनी म्हटले आहे.

यावेळी फडणवीस म्हणाले की, ईडी काय करते ते ईडी सांगेल, मला असं वाटतं की, संजय राऊत सध्या व्हिक्टिम कार्ड खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. हे सगळे वक्तव्य त्याचाच भाग आहे. राऊतांनी त्यांचे मत न्यायालयात मांडावे. रोज सकाळी 9.00 वाजता येऊन संजय राऊत मनोरंजन करण्याचे काम करत असतात. त्याच्यापेक्षा त्यांच्या वक्व्याला महत्त्व देऊ शकत नाही. त्यांना एवढेच सांगू इच्छितो की, सिंह कधी गिधडांच्या धमक्यांना घाबरत नाही. त्यांनी न्यायालयात जावे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार त्रास देण्याचे काम करत नाही. यामुळे त्यांनी “व्हिक्टिम कार्ड” खेळण सोडावे, असा पलटवार फडणवीसांनी राऊतांवर केला आहे. संजय राऊत संपादक आहेत. त्यामुळे त्यांना माहिती आहे की, हेडलाईन कशी करता येईल. म्हणून ते तशा प्रकारचे वक्तव्य करुन दिवसभर चर्चेत राहण्याचे काम करतात, असे फडणवीस म्हणाले.

Raut’s only victim card: Lion is not afraid of vultures; Fadnavis’s counterattack

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात