वृत्तसंस्था
टोकियो : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पृथ्वीवरून उंदराचे वीर्य नेण्यात आले होते. तब्बल सहा महिन्यानंतर ते सुस्थितीत राहिले. त्यामुळे भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी हा प्रयोग महत्वाचा ठरणार आहे. Rat semen stored in the space station In good condition after six months; The birth of cute puppies
पृथ्वीवरून 2013 मध्ये उंदरांचे वीर्य संशोधनासाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात नेले होते. या विर्यावर वैश्वीक किरणांचा काय परिणाम होतो हे पहायचे होते. त्यासाठी गोठविलेल्या स्वरूपात हे वीर्य साठविले गेले. सहा महिन्यानंतर ते पृथ्वीवर आणले आणि मादी उंदराशी त्या विर्याचा संयोग घडवून आणला. आश्चर्य म्हणजे या विर्याच्या संयोगातून जन्मलेले उंदिर सुदृढ निघाले आहेत. पण, ते दिसायला किंचित पृथ्वीवरील उंदरांपेक्षा थोडेसे वेगळे आहेत. परंतु जनुकीय दृष्ट्या त्यांच्यात फरक कोणताच नाही.
या प्रयोगामुळे भविष्यातील मानवी मोहिमाना बळ मिळण्याची आशा बळावली आहे. आपल्या अवकाश गंगेबाहेर जीवन वसविले झाले तर मोठा काळ प्रवासासाठी लागणार आहे. तेव्हा मानवासह अन्य प्राण्यांचे वीर्य अशाच प्रकारे जतन करून इतरत्र जीवसृष्टी निर्माण करण्यास चालना मिळेल, असा होरा शास्त्रज्ञांचा आहे. जपानी शास्त्रज्ञानी याबाबत संशोधन करून हा निष्कर्ष काढला आहे.या संदर्भातील एक संशोधन निबंध सायन्स जर्नल मध्ये प्रकाशित झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App