हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला, त्यापैकी सहा गोळ्या लागल्या.
विशेष प्रतिनिधी
धनबाद : झारखंडमधील धनबादमध्ये मंगळवारी रात्री उशिरा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) सक्रिय स्वयंसेवकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. धनबादच्या पूर्व टुंडी गावातील रहिवासी शंकर प्रसाद यांच्यावर हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला, त्यापैकी सहा गोळ्या त्यांच्या शरीराला लागल्या. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. Rashtriya Swayamsevak Sangh volunteer murdered in Dhanbad Jharkhand
मिळालेल्या माहितीनुसार, शंकर प्रसाद हे धनबादमधील आरएसएसचे सक्रिय स्वयंसेवक आणि कल्याण केंद्राचा जिल्हा प्रमुख होते. मंगळवारी रात्री उशिरा ते काही कामानिमित्त त्यांच्या घराजवळील स्मशानभूमीत गेले होते, त्यावेळी हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी सकाळी आजूबाजूच्या लोकांना याची माहिती मिळाली, त्यानंतर पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली.
पोलिसांना दिलेल्या माहितीत मृत शंकर यांच्या नातेवाईकांनी म्हटले आहे की – शंकर हे आरएसएसचे स्वयंसेवक होते आणि ते सक्रियपणे काम करत होते. त्यामुळे हल्लेखोरांनी त्याला जीवे मारले. त्यांनी पोलिसांना नेहमीच सहकार्य केले, त्यामुळेच काही असामाजिक तत्वांनी ही घटना घडवली आहे.
याशिवाय कुटुंबीय म्हणाले, या संपूर्ण घटनेची सीबीआयमार्फत चौकशी करावी. जेणेकरून या प्रकरणातील मुख्य आरोपींना अटक करता येईल. त्याचवेळी, कुटुंबीयांनी हेही सांगितले की, हत्येसाठी राज्याबाहेरून शूटर्स बोलावण्यात आले होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App