विशेष प्रतिनिधी
पुणे : कॉमेडीच्या विश्वातलं प्रसिद्ध नाव कपिल शर्मा वेगवेगळ्या कारणांसाठी नेहमीच चर्चेत असतो. मध्यंतरी त्याने नंदिता दास यांनी दिग्दर्शित केलेला Zwigato या चित्रपटाच्या माध्यमातून एका डिलिव्हरी बॉय ची भूमिका साकारली. आणि अनेकांकडून त्याच्या भूमिकेचे कौतुक झालं. कॉमेडियन कपिल ने त्याची ही मध्यमवर्गीय डिलिव्हरी बॉय ची भूमिका उत्तम प्रकारे साकारत त्याच्या चहा त्याला आणखी एक सुखद धक्का दिला. Nandita Das movie Zwigato in now Oscar library.
अनेक फिल्म फेस्टिवल मध्ये गौरवलेल्या त्याच्या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर मात्र म्हणावं तितकं यश मिळालं नाही. आता मात्र नंदिता दास दिग्दर्शित Zwigato या सिनेमाची दखल ऑस्कर लायब्ररी ने घेतली आहे.
या चित्रपटाची स्क्रिप्ट अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसच्या लायब्ररीचा एक भाग बनली आहे. नंदिता दास यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाची पटकथा समीर पाटील यांनी लिहिली आहे.
एकीकडे कपिल शर्माच्या झ्विगाटो या चित्रपटाला ऑस्कर लायब्ररीत स्थान मिळाले आहे. दुसरीकडे Zwigato ला ऑस्करमध्ये विशेष स्थान मिळताच या चित्रपटाच्या दिग्दर्शिका आणि सहलेखिका नंदिता दास यांनी ओटीटी प्लॅटफॉर्म टिकास्त्र सोडलं आहे.
ऑस्कर लायब्ररीतील Zwigatoला स्थान मिळाल्यानंतर नंदिता दास यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर करत सर्वाचे आभार मानले. नंदिता आपल्या पोस्टमध्ये लिहिते की, ‘मला अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस म्हणजेच ऑस्करकडून एक ईमेल आला तेव्हा मला खुप आश्चर्य आणि आनंद झाला की त्यांनी त्यांच्या कायमस्वरूपी कोर-कलेक्शनमध्ये Zwigatoच्या स्क्रिप्टला स्थान दिलं आहे.ही एक आनंदाची बातमी आहे की चित्रपट महत्वाचा होता आणि आम्ही तो बनवल्याचा आम्हाला आनंद आहे. माझा विश्वास आहे की जेव्हा कथा वास्तविक असतात आणि संदर्भाशी जोडल्या जातात तेव्हा त्या संस्कृती आणि सीमा तोडतात आणि जागतिक सिनेमाचा एक भाग बनतात…’
त्याचबरोबर OTT प्लॅटफॉर्मवर निशाणा साधतांना नंदिताने लिहिले की, ‘आशा आहे की OTT प्लॅटफॉर्म देखील हे वाचत असाल! मला वाटतं आता प्रेक्षकांना Zwigato पाहण्याची संधी दिली पाहिजे. या सन्मानासाठी अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसच्या लायब्ररीचे आभार!’
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App