द्रमूकच्या स्टालिन सरकार विरुद्ध सुप्रीम कोर्टात लढाई जिंकून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तमिळनाडूत 45 ठिकाणी पथ संंचलन यशस्वी


वृत्तसंस्था

चेन्नई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तामिळनाडूच्या द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाच्या स्टालिन सरकार विरुद्ध सुप्रीम कोर्टात लढाई जिंकून अखेर तमिळनाडूत 45 ठिकाणी पथ संचलन यशस्वी केले. राज्यभरातील हे पथ संचलन संघाच्या शिस्तीनुसार शांततेत पार पडले. तामिळनाडूतील द्रमुक सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला चेन्नईसह संपूर्ण तामिळनाडूत पथ संचलन काढायला प्रतिबंध घातला होता. त्याविरुद्ध संघाने मद्रास हायकोर्टात धाव घेतली होती. त्यावेळी केलेल्या युक्तिवादात द्रमूक सरकारने संघाच्या पथ संचलनामुळे तामिळनाडूमध्ये अशांतता माजण्याची शक्यता वर्तवली होती. परंतु मद्रास हायकोर्टाने द्रमूक सरकारचा तो आदेश फेटाळून लावत संघाला पथ संचलनाची परवानगी दिली होती.Rashtriya Swayamsevak Sangh successfully conducts road campaign in 45 places in Tamil Nadu after winning Supreme Court battle against DMK’s Stalin government



मद्रास हायकोर्टाच्या निर्णयाविरुद्ध द्रमूकचे स्टालिन सरकार सुप्रीम कोर्टात गेले होते. मात्र तेथेही स्टालिन सरकारला हार पत्करावी लागली आणि सुप्रीम कोर्टाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला चेन्नईसह तामिळनाडूमध्ये पथ संचलन करण्याची परवानगी दिली. या परवानगीनुसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी चेन्नईसह 45 ठिकाणी सघोष पथ संचलन केले. ते संघाच्या शिस्तीनुसार शांततेत पार पडले.

https://youtu.be/e-ZAVeVtn5g

Rashtriya Swayamsevak Sangh successfully conducts road campaign in 45 places in Tamil Nadu after winning Supreme Court battle against DMK’s Stalin government

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात