
वृत्तसंस्था
चित्रकूट (जि.सतना), मध्य प्रदेश : “देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यापूर्वीच ही लाट रोखण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दक्ष झाला आहे. त्यासाठी देशव्यापी प्रशिक्षण
स्वयंसेवकांना दिले जाणार आहे. Rashtriya Swayamsevak Sangh Is On Alert Mode ; Nationwide training of volunteers to prevent the third wave of corona
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या २७ हजार १६६ शाखा प्रशिक्षणासाठी सज्ज झाल्या असून प्रशिक्षित स्वयंसेवक २.५ लाख ठिकाणी कार्य करण्यासाठी पोचणार आहेत. याबाबतची माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी दिली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठकीत विविध विषयांवर चर्चा होण्याबरोबर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत विचारमंथन झाले. त्यात स्वयंसेवकांच्या सहभाग घेण्यासाठी लसीकरणा साठी सुविधा केंद्र आणि त्यासाठी प्रोत्साहन अभियान याचा आढावा घेतला.
तिसरी लाट रोखण्यासाठी सरकार आणि प्रशासन यांना सहकार्य करण्यासाठी हे प्रशिक्षणशिबिर आयोजित केले जात आहे.नागरिकांना योग्य माहिती देण्यासाठी आणि समाजाचे अशा कठीण प्रसंगात मनोबल वाढविण्यासाठी स्वयंसेवक २.५ लाख ठिकाणी पोचणार आहेत.
ऑगस्टमध्ये प्रशिक्षण दिले जाईल आणि सप्टेंबरमध्ये जनजागरण करून गाववतील वस्त्यांना स्वयंसेवकांना सलग्न केले जाईल. या प्रशिक्षणात महिला आणि मुलांची काळजी कशी घायची याचे प्रशिक्षण प्रामुख्याने दिले जाईल.
दरम्यान, कोरोनाचे संकट जसे जसे कमी होत आहे. त्या प्रमाणे संघाच्या शाखा पूर्ववत मैदानात संचलन करताना दिसू लागल्या आहेत. देशातील३९ हजार ४५४ शाखा सुरु झाल्या आहेत. त्यापैकी २७ हजार १६६ शाखा मैदानात सुरु झाल्या आहेत.
१२ हजार २८८ इ शाखा असून साप्ताहिक शाखांची संख्या १० हजार १३० आहे. त्यापैकी ६ हजार ५१० मैदानात भरविल्या जात आहेत. ३ हजार ६२० शाखा ऑनलाइन सुरु आहेत. कुटुंब मिलन शाखांची संख्या ९ हजार ६३७ एवढी आहे.
Rashtriya Swayamsevak Sangh Is On Alert Mode ; Nationwide training of volunteers to prevent the third wave of corona
महत्त्वाच्या बातम्या
- गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल म्हणाले, कोरोना चीन्यांसारखाच, त्याच्यावर विश्वास ठेवणे अवघड
- पाकिस्तानातील सात तरुणी बनल्या सर्जन, कट्टरपंथी म्हणाले त्या झाल्या भ्रष्ट, डॉक्टर बनण्याऐवजी त्यांनी चांगली बायको आणि आई बनायल हवे होते
- ऑस्ट्रेलियात या वर्षातील पहिलाच कोरोना बळी, ७७ जणांना कोरोनाचा प्रादुर्भाव
- जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांसाठी चने-फुटाणेच, तीन ते ८५ लाखांपर्यंत भरपाईची मागणी आणि हाता टिकवताहेत २३ हजार रुपये
- भारताच्या नव्या कायद्याची ट्विटरकडून अंमलबजावणी सुरू, १३३ पोेस्ट हटविल्या, १८ हजार अकाऊंटस केली निलंबित