पाकिस्तानातील सात तरुणी बनल्या सर्जन, कट्टरपंथी म्हणाले त्या झाल्या भ्रष्ट, डॉक्टर बनण्याऐवजी त्यांनी चांगली बायको आणि आई बनायल हवे होते


विशेष प्रतिनिधी

इस्लामाबाद : पाकिस्तानातील सात तरुणी सर्जन बनल्या आहेत. देशातील अनेकांनी याचे स्वागत केले आहे. मात्र, कट्टरपंथीयांनी मात्र या तरुणी भ्रष्ट झाल्याचे म्हटले आहे. डॉक्टर होण्याऐवजी त्यांनी चांगली बायको आणि आई बनायला हवे होते असे कट्टरपंथीयांचे म्हणणे आहे.Seven young women in Pakistan became surgeons, radicals say they became corrupt, they wanted to be good wives and mothers instead of doctors

पाकिस्तानातील प्रसिध्द सर्जन डॉ. जावेद इक्बाल यांनी एक ट्विट केले होते. यामध्ये आपल्या सात विद्यार्थिनींचा फोटो शेअर करत म्हटले होते की मुली सर्जरी करू शकत नाही असे कोण म्हणते? या सातही जणी सर्जन आहेत. त्यांना प्रशिक्षित करण्याची संधी मला मिळाली हा माझा बहुमान समजतो.



मात्र, पाकिस्तानातील कट्टरपंथीयांनी यावरून डॉ. जावेद इक्बाल यांच्यावर टीका सुरू केली आहे. या तरुणींनी सर्जन बनायला नको होते. त्यांनी चांगली पत्नी आणि आई होण्याची गरज आहे. एकाने तर म्हटले त्यांना वाईट मार्गाला लावले जात आहे. चांगली पत्नी आणि आई म्हणूनच त्या चांगले जीवन जगू शकल्या असते.

त्यांच्यावर विनाकारण ओझे टाकले आहे. त्यापेक्षा अधिक आरामदायी जीन त्या जगू शकल्या असत्या. दुसऱ्या एकाने तर महिलांचे हे क्षेत्रच नाही. त्यांची शारीरिक क्षमता सर्जरीसाठी लायक नसल्याचे म्हटले आहे. त्यांना सर्जरी शिकविण्याऐवजी बुरखा घ्यायला शिकविले असते तर अधिक चांगले असते.

काही जणांनी मात्र त्यांचे कौतुकही केले आहे. पाकिस्तानमध्ये महिला डॉक्टरांची कमतरता आहे. अनेक महिला पुरुष डॉक्टरांकडे जाणे पसंत करत नाही. केवळ महिला डॉक्टर नसल्यामुळे अनेक जणी उपचारापासून वंचित राहत आहेत.

पाकिस्तानात महिला डॉक्टरांना प्रॅक्टीस करणे अवघड होत आहे. एका महिला डॉक्टरने ट्विट करून म्हटले आहे की, मला सर्जरीचे काम सोडावे लागले. कारण माझे पुरुष सहकारी माझे नकारात्मक बोलून माझे मनोबल कमी करायचे.

Seven young women in Pakistan became surgeons, radicals say they became corrupt, they wanted to be good wives and mothers instead of doctors

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात