Ranil Wickramasinghe : श्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी 39 उमेदवार; रानिल विक्रमसिंघे यांचा उमेदवारी अर्ज स्वीकारला

Ranil Wickramasinghe

वृत्तसंस्था

कोलंबो : श्रीलंकेत 21 सप्टेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रपतीपदासाठी एकूण 39 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. यामध्ये विद्यमान अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे ( Ranil Wickramasinghe ) यांचा समावेश आहे. विक्रमसिंघे यांनी गेल्या महिन्यात 27 जुलै रोजी गाले येथील रॅलीत निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केला होता.

उमेदवारी स्वीकारल्यानंतर विक्रमसिंघे म्हणाले की, आपल्याला देशाची अर्थव्यवस्था स्थिर करायची आहे. विक्रमसिंघे यांच्याशिवाय नामांकन दाखल करणाऱ्यांमध्ये दोन बौद्ध भिक्खू आणि तीन तमिळ अल्पसंख्याकांचाही समावेश आहे. मात्र, अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एकही महिला उमेदवार नाही.



उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यासाठी सकाळी 9 ते 11 अशी वेळ देण्यात आली होती. श्रीलंकेच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने उमेदवार राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाग घेत आहेत. यापूर्वी 2019 मध्ये झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत 35 उमेदवारांनी भाग घेतला होता.

श्रीलंकेची एकूण लोकसंख्या 2.2 कोटी आहे. यापैकी 1.7 कोटी लोक सप्टेंबरमध्ये होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करणार आहेत.

अध्यक्षपदासाठी चार प्रमुख उमेदवारांमध्ये स्पर्धा

श्रीलंकेत राष्ट्रपतीपदासाठी चार प्रमुख उमेदवार आहेत. यामध्ये विद्यमान हंगामी अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे हे सर्वात मोठे दावेदार आहेत. विक्रमसिंघे यांच्यासमोर सर्वात मोठे आव्हान 57 वर्षीय सजिथ प्रेमदासा यांचे आहे. प्रेमदासा हे श्रीलंकेच्या संसदेत विरोधी पक्षाचे नेते आहेत.

याशिवाय डाव्या नेत्या अनुरा कुमारा दिसानायका याही राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत पुढे आहेत. अनुरा यांची नॅशनल पीपल्स पार्टीची आघाडी श्रीलंकेतील तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे. गेल्या आठवड्यात या त्रिकोणी स्पर्धेत चौथे नाव जोडले गेले.

श्रीलंकेच्या राजकारणात बऱ्यापैकी प्रभाव असलेल्या राजपक्षे कुटुंबाने नमल राजपक्षे यांना राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत उतरवले आहे. नमल हे माजी राष्ट्रपती आणि पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांचे पुत्र आणि माजी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांचे पुतणे आहेत. गेल्या आठवड्यापर्यंत राजपक्षे कुटुंब रानिल विक्रमसिंघे यांच्या समर्थनात होते.

39 Candidates for Presidential Election in Sri Lanka; Ranil Wickramasinghe

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात