हनुमानाचा राजकीय वध होत असताना राम शांत बसणार नाहीत असा विश्वास मला वाटतोय, अशा शब्दांत लोकजनशक्ती पक्षाच्या वादात चिराग पासवान यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे घातले आहे.Ram will not sit idly by while Hanumana is being politically assassinated, Chirag Paswan’s direct confrontation with Prime Minister Narendra Modi
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : हनुमानाचा राजकीय वध होत असताना राम शांत बसणार नाहीत असा विश्वास मला वाटतोय, अशा शब्दांत लोकजनशक्ती पक्षाच्या वादात चिराग पासवान यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे घातले आहे.
लोक जनशक्ती पक्षामध्ये काका-पुतण्यांमध्ये सुरू असलेल्या तुंबळ राजकीय युद्धामध्ये लोकजनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे. पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान आणि त्यांचे काका, दिवंगत रामविलास पासवान यांचे धाकटे बंधू पशुपतीकुमार पारस यांच्यामध्ये पक्षात उभी फूट पडली आहे. या पार्श्वभूमीवर आता चिराग पासवान यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच साकडं घातलं आहे.
ते म्हणाले, मी आजपर्यंत हनुमानाप्रमाणे पंतप्रधानांना प्रत्येक अडचणीच्या काळात साथ दिली. आज जेव्हा हनुमानाचा राजकीय वध करण्याचा प्रयत्न होत असताना मला विश्वास आहे की अशा परिस्थितीत राम शांत बसणार नाहीत. मी प्रत्येक मुद्द्यावर भाजपाच्या सोबत उभा राहिलो. मग तो सीएए, एनआरसीचा मुद्दा का असेना. पण नितिश कुमार यांनी त्याला विरोध केला. आता भाजपाला निर्णय घ्यायचाय की त्यांनी मला पाठिंबा द्यायचा की नितिश कुमार यांना.
पासवान म्हणाले, माझे वडिल आणि लालू प्रसाद यादव हे नेहमीच चांगले मित्र राहिले आहेत. राजदचे नेते तेजस्वी यादव आणि मी एकमेकांना लहानपणापासून ओळखतो. आमची घट्ट मैत्री होती. ते माझे लहान बंधू आहेत. जेव्हा निवडणुका येतील, तेव्हा आघाडीसंदर्भात पक्ष अंतिम निर्णय घेईल.
लोकजनशक्ती पक्ष हा दिवंगत रामविलास पासवान यांनी स्थापन केला आहे. त्यांनी आधी बिहारमधील नितिशकुमार सरकारला पाठिंबा दिला होता. मात्र, मतभेदांमुळे सरकारचा पाठिंबा काढण्याचा निर्णय चिराग पासवान यांनी घेतला. केंद्रातील मोदी सरकारला पाठिंबा कायम राहिलं असं देखील चिराग पासवान यांनी स्पष्ट केलं.
हनुमानाप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी निष्ठा वाहिल्याचं देखील त्यांनी सांगितलं. मात्र, हा निर्णय त्यांचे काका आणि रामविलास पासवान यांचे धाकटे बंधू पशुपतीकुमार पासवान यांना आवडला नाही. पशुपतीकुमार यांच्यासह बिहारमधल्या एकूण ५ खासदारांनी एकत्र येत त्यांची संसदेतील पक्षनेते पदावर निवड जाहीर केली.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी देखील पशुपतीकुमार पारस यांची निवड स्वीकारून अप्रत्यक्षपणे त्यांच्या पक्षनेतेपदाला समर्थन दिलं. या पार्श्वभूमीवर चिराग पासवान यांच्या गटाने थेट संसदेतल्या या पाचही खासदारांना पक्षातून निलंबित केल्याचं पत्रक काढलं. पण त्यानंतर काही दिवसांतच पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीमध्ये पशुपतीकुमार पारस यांचीच पक्षाध्यक्ष म्हणून निवड झाल्याचं जाहीर करण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App