सोशल मीडियाला जबाबदार बनवण्यासाठी आणि वापरकर्त्यांचे संरक्षण करण्यासाठी सतत सूचना दिल्या जात आहेत.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्र सरकारचा सध्या कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याचा आसा कोणताही हेतू नाही. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी गुरुवारी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. Rajya Sabha: Union Minister Chandrasekhar said that at present there is no intention to ban any media platform
संसद टीव्ही नवे चॅनेल सूरु ; राज्यसभा टीव्हीतील जाणूनबुजून भाजपविरोधी बातम्या पेरणाऱ्यांना बसला अंकूश
ते म्हणाले की, सोशल मीडियाला जबाबदार बनवण्यासाठी आणि वापरकर्त्यांचे संरक्षण करण्यासाठी सतत सूचना दिल्या जात आहेत, परंतु सध्या सरकारचा असा कोणताही हेतू नाही.
परंतु काही वापरकर्ते तिरस्कार आणि द्वेष पसरवण्यासाठी सोशल मिडियाचा गैरवापर करतात, पण कोणतेही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म किंवा इतर कोणतेही माध्यम भारतीय लोकशाही नष्ट करू शकत नाही. पुढे चंद्रशेखर म्हणाले की, सोशल मिडीयाचा गैरवापराच्या अनेक तक्रारीही प्राप्त होतात, ज्याला त्यानुसार उत्तर दिले जाते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App