जाणून घ्या, अनंत राय महाराज कोण आहेत?
विशेष प्रतिनिधी
कोलकाता : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाने पश्चिम बंगालमधून अनंत राय महाराज यांना उमेदवारी दिली आहे. पक्षाने आज (11 जुलै) ही घोषणा केली आहे. अनंत राय महाराज हे ग्रेटर कूचबिहार चळवळीचे प्रमुख होते. राज्यसभेच्या 10 जागांसाठी 24 जुलै रोजी निवडणूक होणार असल्याचे निवडणूक आयोगाने 27 जून रोजी जाहीर केले आहे. Anant Rai Maharaj will be BJPs Rajya Sabha election candidate from West Bengal
यामध्ये पश्चिम बंगालमधील 6, गुजरातमधील 3 आणि गोव्यातील 1 जागांचा समावेश आहे. सध्याच्या राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ 18 ऑगस्ट रोजी संपत आहे. यामध्ये टीएमसीचे डेरेक ओब्रायन, डोला सेन, सुष्मिता देव, सुखेंदू शेखर राय, शांता छेत्री आणि पश्चिम बंगालमधील काँग्रेसचे प्रदीप भट्टाचार्य यांचा समावेश आहे.
पश्चिम बंगालमधील 6 जागांपैकी 5 जागांवर टीएमसीचा आणि एका जागेवर भाजपचा विजय निश्चित मानला जात आहे. अनंत महाराज विजयी झाल्यास बंगालमधून राज्यसभा सदस्य म्हणून भाजपचा नेता निवडून येण्याची ही पहिलीच वेळ असेल.
कोण आहेत अनंत राय महाराज? –
अनंत राय महाराज हे प्रभावी राजवंशी आणि भाजप नेते आहेत. बंगालमध्ये, ते अनुसूचित जाती प्रवर्गातून येतात. उत्तर बंगालमधील 54 विधानसभेच्या जागांसाठी या समुदायाचे सुमारे 30 टक्के मतदार आहेत. पश्चिम बंगालमधील कूचबिहार, दिनाजपूर आणि जलपाईगुडी जिल्ह्यांमध्ये त्यांचा प्रभाव आहे. ते ग्रेटर कूचबिहार पीपल्स असोसिएशनचे अध्यक्ष आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more