प्रतिनिधी
मुंबई : राज्यसभेतील राष्ट्रपती नियुक्त मावळते खासदार संभाजीराजे यांना पुन्हा एकदा राज्यसभेची संधी दिली जाऊ शकते, अशी महाराष्ट्राची चर्चा आहे. पण ती राष्ट्रपती नियुक्तीची नसून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीचे घटक पक्ष एकत्र येऊन पण त्यांना राज्यसभेवर पाठवू शकतात, असे बोलले जात आहे. Rajya Sabha discussion from Mahavikas Aghadi; But the goodwill gift of Fadnavis
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कोल्हापूर दौऱ्यात जेव्हा त्यांना संभाजीराजे यांच्या संदर्भातला प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी आघाडीतील सर्व घटक पक्षांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेऊ, असे उत्तर दिले. यातून पवारांनी संभाजीराजे यांच्या राज्यसभा सदस्यत्वाविषयी सकारात्मक संकेत दिल्याचे बोलले जात आहे. राज्यसभेत जेव्हा महाराष्ट्राचा प्रश्न येतो तेव्हा पक्षभेद विसरून आपण एकत्र यावे, असे आवाहन केल्यानंतर संभाजीराजे आमच्यासोबत येतात असे सूचक विधान देखील पवार यांनी पत्रकार परिषदेत केले.
त्यामुळे संभाजी राजे यांच्या वैयक्तिक राजकीय भूमिकेविषयी तसेच महाविकास आघाडी त्यांना अनुकूल भूमिका घेत असल्या विषयीची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांनी आज माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतल्या त्यांच्या “सागर” निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. आपल्याला राष्ट्रपती नियुक्त खासदारकी देण्यात देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी आपण भेट घेतल्याचे ट्विट संभाजीराजे यांनी केले आहे.
मुंबई येथे देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतली. राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा सदस्य म्हणून माझी निवड होण्यामागे त्यांचाही मोलाचा हातभार होता, याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले… pic.twitter.com/46aP2HBn4w — Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) May 10, 2022
मुंबई येथे देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतली. राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा सदस्य म्हणून माझी निवड होण्यामागे त्यांचाही मोलाचा हातभार होता, याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले… pic.twitter.com/46aP2HBn4w
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) May 10, 2022
12 तारखेला भूमिका जाहीर
संभाजीराजे परवा दिवशी म्हणजे 12 मे रोजी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आपली स्वतंत्र भूमिका जाहीर करणार आहेत. त्यांना शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेस या सर्व पक्षांनी आपल्या पक्षात येण्याचे निमंत्रण दिले आहे.
संभाजीराजे – प्रकाश आंबेडकर एकत्र??
त्याचबरोबर अनेक प्रसार माध्यमांनी संभाजीराजे यांनी कोणत्या पक्षात जावे याविषयी मतचाचण्या देखील जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये अनेकांनी संभाजीराजे आणि प्रकाश आंबेडकर यांनी एकत्र येऊन महाराष्ट्रात स्वतंत्र पर्याय द्यावा, असे मत व्यक्त केले आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजीराजे आक्रमक आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी देखील त्यांना पाठिंबा व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे आणि प्रकाश आंबेडकर यांनी एकत्र येण्याची सूचना अनेकांनी केली आहे. आता 12 तारखेला संभाजीराजे नेमकी कोणती भूमिका जाहीर करणार?, याची उत्सुकता महाराष्ट्राला लागली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App