जम्मू -काश्मीरमध्ये भारतीय जनता पक्षाशी संबंधित नेते आणि लोकांवरील हल्ले गेल्या काही दिवसांपासून तीव्र झाले आहेत. Rajouri: 4-year-old boy killed, seven family members injured in terrorist attack on BJP leader’s house
विशेष प्रतिनिधी
राजौरी : जम्मू -काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात भाजपा नेते जसबीर सिंह यांच्या घरावर गुरुवारी ग्रेनेडने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जसबीर सिंगच्या चार वर्षांच्या पुतण्याचा मृत्यू झाला आहे. तर या संपूर्ण हल्ल्यात कुटुंबातील 7 सदस्य जखमी झाले आहेत.
गुरुवारी राजौरी जिल्ह्यातील खंडली भागात जसबीर सिंह यांच्या घराला दहशतवाद्यांनी लक्ष्य केले. जेव्हा त्याचे कुटुंब त्यांच्या टेरेसवर होते, तेव्हा दहशतवाद्यांनी घरात ग्रेनेड फेकला. या घटनेनंतर राजौरीमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे, तर आज स्थानिक संघटनांनी बंद ची घोषणा केली आहे.
जम्मू -काश्मीरमध्ये भारतीय जनता पक्षाशी संबंधित नेते आणि लोकांवरील हल्ले गेल्या काही दिवसांपासून तीव्र झाले आहेत. राजौरीच्या घटनेपूर्वीच, या महिन्यात अनंतनागमध्ये भाजप नेते गुलाम रसूल दार यांची हत्या झाली होती.
स्वातंत्र्यदिनापूर्वी दहशतवाद्यांकडून अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जम्मू -काश्मीरच्या वेगवेगळ्या भागात दहशतवाद्यांकडून हल्ले केले जात आहेत. गुरुवारीच सुरक्षा दलांवर श्रीनगर-जम्मू महामार्गावर दहशतवाद्यांनी हल्ला केला, त्यानंतर सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली.
याशिवाय गुरुवारी जम्मू -काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. यानंतर, सुरक्षा दल, दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली आणि सुरक्षा दलांनी एक दहशतवादी ठार केला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App