आणीबाणीच्या काळातील ‘ती’ कटू आठवण सांगून भावूक झाले राजनाथ सिंह, म्हणाले…

पाकिस्तान दहशतवादावर नियंत्रण ठेवू शकत नसेल तर… असंही राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : सध्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंह निवडणूक प्रचार सभांमधून पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका मुलाखतीत संरक्षणमंत्र्यांनी दहशतवादाचा सामना करण्यासाठी पाकिस्तानला मदत करण्याची ऑफर दिली आहे. पाकिस्तान दहशतवादावर नियंत्रण ठेवू शकत नसेल तर भारत दहशतवाद रोखण्यासाठी सहकार्य करण्यास तयार आहे, असे ते म्हणाले.Rajnath Singh became emotional after recounting bitter memory of Emergency



राजनाथ सिंह म्हणाले, ‘पाकिस्तानकडून माझी अपेक्षा आहे की, दहशतवादाची मदत घेऊन भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. पाकिस्तानला दहशतवादावर नियंत्रण ठेवावे लागेल. पाकिस्तानला वाटत असेल की तो दहशतवादावर नियंत्रण ठेवू शकत नाही, तर शेजारी देश भारताकडून सहकार्य मागू शकतो. दहशतवाद रोखण्यासाठी भारत सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहे.’

याशिवाय, ‘1975 मध्ये लागू करण्यात आलेल्या आणीबाणी आणि काँग्रेस पक्षाबाबत बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह भावूक झाले. ते म्हणाले, ‘ज्यांनी हुकूमशाही आणीबाणी लादली ते आता आमच्यावर हुकूमशहा असल्याचा आरोप करत आहेत. माझ्या आईला ब्रेन हॅमरेज झाला होता, तरी काँग्रेस सरकारने मला पॅरोल दिला नाही. मी माझ्या आईच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकलो नाही. माझी आई 27 दिवस रुग्णालयात राहिली आणि मला तुरुंगात ठेवण्यात आले. मला आईशी शेवटच्या क्षणीही भेटू दिले नाही.’

Rajnath Singh became emotional after recounting bitter memory of Emergency

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात