विशेष प्रतिनिधी
पुणे : केंद्राच्या पैशावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कॉँग्रेसचे लांगूलचालन करत पिंपरी चिंचवड येथे उभारण्यात येणाºया विज्ञान अविष्कार नगरीला राजीव गांधी यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला. परंतु, या प्रकल्पासाठी केंद्राने १९१ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. Rajiv Gandhi’s name for the science inventions city, citizens demand name of Ratan Tata
केंद्र सरकार पुरस्कृत योजनेअंतर्गत पिंपरी-चिंचवडमध्ये 191 कोटी रुपयांचा ‘विज्ञान आविष्कार’ प्रकल्प साकारला जाणार आहे. असा महत्त्वाकांक्षी प्रकल्प शहराला दिल्याबाबत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे तमाम पिंपरी-चिंचवडकरांच्या वतीने जाहीर आभार मानत आमदार महेश लांडगे यांनी म्हटले आहे की,या प्रकल्पाला ‘भारतरत्न राजीव गांधी विज्ञान आविष्कार नगरी’ असे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु, या प्रकल्पाला पिंपरी-चिंचवडच्या विकासात आणि औद्योगिक क्षेत्राला मोलाचे योगदान देणाºया ‘पद्मविभूषण रतन टाटा’ यांचे नाव द्यावे, अशी आम्हा पिंपरी-चिंचवडकरांची आग्रही मागणी आहे.
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे, भविष्यातील वैज्ञानिक घडविणे यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात ८ एकर जागा उपलब्ध असून त्यापैकी एक एकर जागेत यापूर्वी तेथे विभागीय पातळीचे विज्ञान केंद्र उभारण्यात आले आहे तर उर्वरित ७ एकर क्षेत्रफळावर जागतिक दजार्ची, विज्ञानातील विविध संकल्पनांवर आधारित भारतरत्न राजीव गांधी विज्ञान अविष्कार नगरी पुढील पाच वर्षात उभारण्यात येईल. केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत यासाठी १९१ कोटीच्या खर्चास मान्यता देण्यात आली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App