पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले राजीव बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राजीव बॅनर्जी यांनी रविवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील पक्षात पुन्हा प्रवेश केला. TMC राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी रविवारी त्रिपुराची राजधानी आगरतळा येथे एका जाहीर सभेला संबोधित केले. यादरम्यान राजीव बॅनर्जी आणि भाजपचे माजी नेते आशिष दास यांनी टीएमसीमध्ये प्रवेश केला.Rajib Banerjee returns to TMC thanks Mamata Banerjee says Joining BJP was a mistake
प्रतिनिधी
कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले राजीव बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राजीव बॅनर्जी यांनी रविवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील पक्षात पुन्हा प्रवेश केला. TMC राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी रविवारी त्रिपुराची राजधानी आगरतळा येथे एका जाहीर सभेला संबोधित केले. यादरम्यान राजीव बॅनर्जी आणि भाजपचे माजी नेते आशिष दास यांनी टीएमसीमध्ये प्रवेश केला.
BJP leader Rajib Banerjee to join TMC today during TMC general secretary Abhishek Banerjee's public meeting in Tripura. (File photo) pic.twitter.com/TIe2NKbHRL — ANI (@ANI) October 31, 2021
BJP leader Rajib Banerjee to join TMC today during TMC general secretary Abhishek Banerjee's public meeting in Tripura.
(File photo) pic.twitter.com/TIe2NKbHRL
— ANI (@ANI) October 31, 2021
राजीव बॅनर्जी यांनी भाजपमध्ये जाणे माझी मोठी चूक होती, असे म्हटले आहे. ते म्हणाले, “मला पुन्हा पक्षात येण्याची परवानगी दिल्याबद्दल मी अभिषेक बॅनर्जी आणि ममता बॅनर्जी यांचा आभारी आहे.” भाजपवर हल्लाबोल करताना राजीव बॅनर्जी यांनी दावा केला की, पक्षाने एक मोहक प्रतिमा निर्माण केली आहे.”भाजपमध्ये येण्यापूर्वी रोजगार आणि शेतीबाबत अनेक आश्वासने देण्यात आली होती, जी अद्याप पूर्ण झालेली नाहीत,” असा आरोप बॅनर्जी यांनी केला.
परिवर्तन येत आहे : राजीव बॅनर्जी
टीएमसीमध्ये पुन्हा सामील झाल्यानंतर राजीव बॅनर्जी म्हणाले, ‘मी एक निर्णय घेतला होता जो ममतांनी मला घेण्यापासून रोखले होते आणि अभिषेक बॅनर्जी यांनी मला समजावून सांगितले होते. पण आज मला लाज वाटते. मी थांबलो असतो, तर पुढे चांगला रस्ता दाखवला असता.” राजीव बॅनर्जी म्हणाले, ”बदल येत आहे.
मला पुन्हा लोकांसाठी काम करायचे आहे. खरे तर बंगाल विधानसभा निवडणुकीत टीएमसीचा विजय होताच राजीव बॅनर्जींचे शब्द बदलू लागले. त्यांनी भाजपच्या धोरणांवर उघड टीका करणे सुरू केले होते, तेव्हापासूनच ते पुन्हा तृणमूलवासी होणार असे आडाखे बांधले जात होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App