केंद्रीयमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी दिल्लीत गेहलोत सरकारवर साधला निशाणा
विशेष प्रतिनिधी
दिल्ली : भारतीय जनता पक्षाने सोमवारी राजस्थानमधील अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारवर “भ्रष्टाचाराचे सर्व रेकॉर्ड मोडले” असा आरोप केला आणि ‘लाल डायरी’चे रहस्य उघड झाल्यास अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात येईल असा दावा केला. Rajasthan If the secret of Red Diary is revealed the political existence of many leaders will be in danger BJP claims
एक दिवसापूर्वी, राजस्थानचे माजी मंत्री आणि काँग्रेस आमदार राजेंद्र गुढा यांनी दावा केला होता की त्यांनी पक्षाचे नेते धर्मेंद्र राठोड यांच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि आयकर विभागाने छापे टाकल्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार ‘लाल डायरी’ मिळवून मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना अडचणीतून वाचवले.
मैं अशोक गहलोत से पूछना चाहता हूं कि वह लाल डायरी क्या है और उस लाल डायरी को लेकर सरकार में और मुखिया जी में इतनी घबराहट क्यों है? pic.twitter.com/cAOK5TPMWp — Gajendra Singh Shekhawat (मोदी का परिवार) (@gssjodhpur) July 24, 2023
मैं अशोक गहलोत से पूछना चाहता हूं कि वह लाल डायरी क्या है
और उस लाल डायरी को लेकर सरकार में और मुखिया जी में इतनी घबराहट क्यों है? pic.twitter.com/cAOK5TPMWp
— Gajendra Singh Shekhawat (मोदी का परिवार) (@gssjodhpur) July 24, 2023
दिल्लीत पत्रकारांना संबोधित करताना, भाजपा नेते आणि केंद्रीयमंत्री गजेंद्र सिंह शेखावत म्हणाले, “त्या लाल डायरीमध्ये असे काय आहे की संपूर्ण सरकारमध्ये ‘भीती’ आहे.” राजस्थानमधील प्रत्येकाला त्याचे रहस्य जाणून घ्यायचे आहे. तसेच, गुढा यांनी उघड केलेल्या डायरीतील मजकूर समोर आल्यास अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात येईल, असा दावाही शेखावत यांनी केला. खाणकाम, नोकरभरती आणि परीक्षा यासारख्या विविध घोटाळ्यांशी निगडीत डायरींनी काँग्रेस सरकार बरबटलेली असल्याचा दावा त्यांनी केला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App