जैसलमेरमध्ये पाकिस्तानातून आलेल्या हिंदूंच्या वस्तीवर बुलडोझर चालवल्याने टीना दाबी सापडल्या होत्या वादात
विशेष प्रतिनिधी
जयपूर : राजस्थानमधील जैसलमेरमध्ये ४० बिघा जमीन पाकिस्तानी हिंदूंना दिली जाणार आहे. ही जमीन निश्चित झाली असून तिथे सपाटीकरणाचे काम सुरू झाले आहे. पाकिस्तानातून आलेल्या हिंदू निर्वासितांच्या वस्तीवर बुलडोझरची कारवाई केल्यानंतर जिल्हाधिकारी आयएएस टीना दाबी यांच्यावर मोठ्याप्रमाणात टीका झाली होती, मात्र त्यांनी या निर्वासिताचे पुनर्वसनाचे आश्वासन दिले होते.Rajasthan Hindus who came to India from Pakistan will get land Collector Tina Dabi assurance
अहवालानुसार, जिल्हा मुख्यालयापासून पाच किमी अंतरावर असलेल्या मुळसागरजवळ ही जमीन निवडण्यात आली आहे. जमीन सपाटीकरणाचे काम सुरू करण्यापूर्वी पूजाही करण्यात आली. तसेच, वीज आणि पाण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना अर्बन इम्प्रूव्हमेंट ट्रस्टला (यूआयटी) देण्यात आल्या आहेत. या जमिनीवर सुमारे 200 कुटुंबे वसवण्याची योजना आहे.
राहण्यास जमीन मिळत असल्याने निर्वासितही आनंदी आहेत. त्यांनी टीना दाबी यांचे आभार मानले आहेत. पाकिस्तानी हिंदू निर्वासितांच्या पुनर्वसनासाठी स्वतंत्र जमीन देण्याचे UIT चे राजस्थानमधील हे पहिलेच प्रकरण आहे, असे सांगितले जात आहे. सध्या ५० निर्वासित कुटुंबे रात्र निवारागृहात राहत आहेत. टीना दाबी यांच्या सूचनेवरून त्यांच्यासाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. या निर्वासितांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने एक समितीही स्थापन केली आहे. त्यांना नागरिकत्व मिळवून देण्यासाठीही प्रयत्न केले जातील.
16 मे 2023 रोजी राजस्थानमधील जैसलमेर येथील अमर सागर भागात पाकिस्तानी हिंदू निर्वासितांची वस्ती उद्ध्वस्त करण्यात आली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर यूआयटीच्या पथकाने तगड्या पोलिस बंदोबस्तात येथे बुलडोझर चालवला होता. यानंतर टीना दाबी वादात सापडली होती. यानंतर जिल्हा प्रशासनाने बाधितांना राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली होती. जमीन निवडण्यासाठी सर्वेक्षण पथक तयार करण्यात आले होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App