‘थोडी सी तो पिली है’ : पोलिसांनी मद्यपी नातेवाइकाला पकडल्याने काँग्रेसच्या महिला आमदाराचा संताप, पोलिसांशी हुज्जत व्हायरल

राजस्थानच्या जोधपूरमध्ये दारूच्या नशेत गाडी चालवल्याबद्दल एका महिला आमदाराच्या नातेवाइकाचे चालान कापण्यात आले. जेव्हा ही बाब आमदारापर्यंत पोहचली तेव्हा त्यांनी पोलिसांना फोन करून सोडून देण्यास सांगितले. पोलिसांनी ऐकले नाही म्हणून त्या आपल्या पतीसह पोलीस ठाण्यात पोहोचल्या. त्या म्हणाल्या की, प्रत्येकाची मुले पितात, त्याने थोडे पिली तर काय बिघडलं? या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे, त्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. Rajasthan Congress Mla Reached Police Station To Release Relative Said Everyone Drinks 


वृत्तसंस्था

जयपूर : राजस्थानच्या जोधपूरमध्ये दारूच्या नशेत गाडी चालवल्याबद्दल एका महिला आमदाराच्या नातेवाइकाचे चालान कापण्यात आले. जेव्हा ही बाब आमदारापर्यंत पोहचली तेव्हा त्यांनी पोलिसांना फोन करून सोडून देण्यास सांगितले. पोलिसांनी ऐकले नाही म्हणून त्या आपल्या पतीसह पोलीस ठाण्यात पोहोचल्या. त्या म्हणाल्या की, प्रत्येकाची मुले पितात, त्याने थोडे पिली तर काय बिघडलं? या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे, त्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

काँग्रेसच्या आमदार आहेत मीना कंवर

हे प्रकरण जोधपूरच्या रतनदादा पोलीस स्टेशन परिसरातील आहे. शेरगढमधील काँग्रेसच्या आमदार मीना कंवर यांच्या नातेवाइकांना रात्री उशिरा दारूच्या नशेत गाडी चालवल्याबद्दल चालान देण्यात आले, पोलिसांनी त्यांना त्यांच्यासोबत पोलीस ठाण्यात आणले. जेव्हा महिला आमदाराला हे कळले, तेव्हा आधी त्यांच्या पतीने पोलिसांना फोन केला आणि नातेवाइकाला सोडून देण्यास सांगितले, पण पोलिसांनी नकार दिला.



आमदारांचा पोलीस ठाण्यात जमिनीवर ठिय्या

पोलिसांनी नकार दिल्यावर आमदार मीना कंवर आपल्या पतीसह थेट पोलीस ठाण्यात गेल्या आणि स्वतःची ओळख करून दिली. यानंतरही पोलिसांनी नातेवाइकाला सोडले नाही, म्हणून त्या जमिनीवर बसल्या. पोलिसांनी त्याचा संपूर्ण व्हिडिओ बनवला. असे सांगितले जातेय की, त्यांनी या व्हिडिओवरून पोलिसांना धमकीही दिली.

Rajasthan Congress Mla Reached Police Station To Release Relative Said Everyone Drinks

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात