अशोक गेहलोतांची मोदी कॉपी फेल; विद्यापीठे – महाविद्यालयांत बजेट लाईव्ह केले पण जुनेच बजेट वाचून बसले!!

प्रतिनिधी

जयपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विद्यार्थ्यांशी परीक्षेवर चर्चा करतात. विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होतात. त्याचीच वेगळ्या प्रकारची कॉपी करायला राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत करायला गेले. पण मोदींची अशी कॉपी करणे पण त्यांना नीट जमले नाही. उलट राजस्थान बजेट जुनेच भाषण वाचल्यामुळे त्यांची नाचक्की मात्र पुरेपूर झाली. Rajasthan cm ashok Gehlot read old Budget speech in rajasthan assembly, sparked Controversy

अशोक गेहलोत यांनी राजस्थानचे बजेट सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये लाईव्ह टेलिकास्ट करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे बजेटचे लाईव्ह टेलिकास्ट झाले देखील. पण अशोक गेहलोत हेच भर विधानसभेत अशी चूक करून बसले की ज्याचे फक्त राजस्थान भर नाही तर संपूर्ण देशभर हसू झाले. अशोक गेहलोत बजेट भाषण करताना तब्बल पाच मिनिटे 2022 च्या बजेटचे भाषण करत राहिले. त्याचे लाईव्ह प्रसारण सुरू राहिले आणि नंतर हे जुनेच भाषण असल्याचे त्यांचे मंत्री महेश जोशींनी लक्षात आणून दिले. त्यामुळे अशोक गहलोत यांची राजस्थान बरोबरच संपूर्ण देशभरात नाचक्की झाली.

 

प्रत्यक्ष बजेट सादर होताना राजस्थान विधानसभेचे कामकाज अर्धा तास तहकूब करावे लागले. तहकूबी नंतर कामकाज पुन्हा सुरू झाले आणि मग अशोक गेहलोत यांनी बजेटचे 2023 चे नवे भाषण वाचले.

अशोक गेलोत यांच्या या करामतीमुळे विरोधी भाजपला त्यांच्यावर तुफान टोलेबाजी करायची संधी मिळाली. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी गेहलोतांवर सडकून टीका केली. बजेट सारखे महत्त्वाचे डॉक्युमेंट आपण जुनेच वाचतो आहोत हे राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्या लक्षातही आले नाही. पाच मिनिटे ते जुनेच भाषण वाचत राहिले. याच्यावरून समजून येते की राजस्थान त्यांच्यासारख्या मुख्यमंत्र्यांच्या हातात किती सुरक्षित आहे!!, अशी फटकेबाजी वसुंधरा राजे यांनी केली.

बजेट डॉक्युमेंट लीक

राजस्थानच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासात बजेट भाषणात एवढी गंभीर चूक आधी झालेली नव्हती. बजेट डॉक्युमेंट हे गुप्त डॉक्युमेंट मानले जाते. ते लीक झाले तर अर्थमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागतो. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरला नेहरूंच्या मंत्रिमंडळातले अर्थमंत्री जॉन मथाई यांना बजेट डॉक्युमेंट लीक झाल्याबद्दल राजीनामा द्यावा लागला होता. ही 1950 च्या दशकातली घटना आहे आणि इथे तर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राजस्थानच्या बजेट मधले गेल्या वर्षीचे म्हणजे 2022-23 चे भाषण वाचले. त्यातल्या तरतुदी वाचल्या. यामुळे त्यांच्याबरोबरच सरकारची ही नाचक्की झाली आहे. आता येथे राजकीय परिणाम पुढे काय होतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Rajasthan cm ashok Gehlot read old Budget speech in rajasthan assembly, sparked Controversy

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात