राजापूर आगारातील सुमारे वीस आणि पंचवीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती संपात उतरलेल्या कर्मचाऱ्यांनी दिली.Rajapur: Suspended ST employee dies of heart attack
विशेष प्रतिनिधी
राजापूर : राज्यात गेल्या ५४ दिवसांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे.दरम्यान शासनाकडून संप मागे घेऊन कामावर हजर व्हा, असे सातत्याने आवाहन हाेत आहे.परंतु कमावर हजर न झाल्याने संबंधित कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरु आहे.तर काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.तसेच राजापूर आगारातील सुमारे वीस आणि पंचवीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती संपात उतरलेल्या कर्मचाऱ्यांनी दिली.
दरम्यान एसटी संपात सहभागी झाल्याने निलंबित करण्यात आलेल्या राकेश रमेश बांते (वय-३५) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.ही घटना बुधवारी रात्री साडेदहाच्या दरम्यान घडली.राकेश रमेश बांते हे विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील होते.गेली चार वर्षे चालक आणि वाहक अशी दुहेरी जबाबदारी राकेश रमेश बांते सांभाळायचे.
१० डिसेंबर रोजी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. तेव्हापासून ते नैराश्यात होते.दरम्यान बुधवारी ( २२ डिसेंबर )त्यांना अत्यावस्थ वाटू लागल्याने राजापुरातील ग्रामीण रुग्णालयात ॲडमिट करण्यात आले. तेथे उपचार असताना रात्री साडेदहाच्या दरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यामध्ये त्यांची मृत्यू झाला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App