Raj Thackerays : बदलापूरमधील घटेनवरून राज ठाकरे यांची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले…

Raj Thackerays

सरकारवर निशाणा साधला आणि मनसैनिकांना आदेशही दिले आहेत, जाणून घ्या काय म्हणाले.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबईतील बदलापूरमध्ये चिमुकलींवर झालेल्या अत्याचाराची घटना उघडकीस आल्यानंतर काल बदलापूरात हजारो नागरिकांनी रस्त्यावर उतरून आणि रेल्वे रोकून धरत संताप व्यक्त केला. शिवाय या प्रकरणातील आरोपाली तत्काळ फाशी शिक्षा द्यावी, अशी मागणी लावून धरली. तर दुसरीकडे राजकीय पक्षांनीही सरकारला धारेवर धरत पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले.

याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackerays ) यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरेंनी ट्वीटद्वारे म्हटले आहे की, ‘बदलापूरमध्ये जी अत्यंत दुर्दैवी आणि भीषण घटना घडली, त्यावर मी काल पण म्हणलं तसं, यावर कारवाई व्हायला इतका वेळ का लागला? या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या महिला पदाधिकाऱ्यांनी वाचा फोडली, विषय लावून धरला, आणि त्यातून जनआक्रोशाला तोंड फुटलं. ‘



याशिवाय ‘मुळात हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा जिल्हा. या जिल्ह्यातच जर कायदा धाब्यावर बसवला जात असेल तर बाकी ठिकाणची परिस्थिती काय असेल याची कल्पना पण करवत नाही. आज सरकार ‘लाडकी बहीण’ योजनेच्याद्वारे स्वतःच कौतुक करून घेण्यात मग्न आहे, पण जर तुमची बहीण खरंच लाडकी असेल तर तिच्यावर अशी वेळ येऊ नये आणि दुर्दैवाने आलीच तर तिला न्याय मिळेल हे पाहणं, हे पहिलं कर्तव्य नाही का ? जनतेच्या पैशातून, बहिणींना पैसे देऊन, स्वतःचं ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे, ही भावना जरी निर्माण केलीत तरी खूप आहे.’ अशा शब्दांत सरकारवर निशाणा साधला.

तसेच, ‘माझ्या पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांमुळे हा विषय आज समोर आलाय याचा मला अभिमान आहे. पण मुळात असे प्रकार घडू नयेत यासाठी कडक कायदे आणि त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे.’ असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

याआधी काल राज ठाकरे यांनी ‘बदलापूरच्या शाळेत लहान लहान मुलींच्या बाबतीत जो भयानक प्रकार घडला आहे तो धक्कादायक आणि संताप आणणारा आहे. मुळात या घटनेत गुन्हा दाखल करून घेण्यातच पोलिसांनी १२ तास का लावले ? एका बाजूला कायद्याचं राज्य म्हणायचं, आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांच्याकडून झालेला हा कुठला हलगर्जीपणा? माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हा मुद्दा लावून धरला आहे, आणि माझं महाराष्ट्र सैनिकांना सांगणं आहे की या प्रकरणात आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईपर्यंत या विषयांत तुमचं लक्ष असू द्या ….’ असं ट्वीटद्वारे म्हटलं होतं.

Raj Thackerays angry reaction to the incident in Badlapur

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात