रेल्वेचे पथक, अग्निशमन दल, पोलिसांचे पथक आणि इतर पथके घटनास्थळी दाखल
विशेष प्रतिनिधी
दिल्लीतील जाखिरा येथे शनिवारी सकाळी मोठा रेल्वे अपघात झाल्याने खळबळ उडाली आहे. येथे ट्रेनच्या 10 बोगी रुळावरून घसरून उलटल्या आहेत. सुदैवाने ती मालगाडी होती. या अपघातात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. रेल्वेचे पथक आणि अग्निशमन दल घटनास्थळी तैनात आहे.Railway team fire brigade police team and other teams reached the spot
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी 11.42 वाजता अग्निशमन विभागाला जाखिरा उड्डाणपुलाजवळ एक गाडी रुळावरून घसरल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाला ही मालगाडी असल्याचे आढळले, त्यातील 10 बोगी रुळावरून घसरल्या. माहिती मिळताच रेल्वेचे पथक, अग्निशमन दल, पोलिसांचे पथक आणि इतर पथके घटनास्थळी दाखल झाली.
मालगाडीत लोखंडी पत्र्याचे रोल्स भरलेले होते. मात्र, रुळांवर कोणीतरी अडकल्याची शक्यता बचाव कर्मचाऱ्यांनी पूर्णपणे नाकारली नाही. मदत आणि बचाव अजूनही सुरू आहे.व कार्य
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App