विशेष प्रतिनिधी
भोपाळ:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी भोपाळमध्ये राणी कमलापति रेल्वे स्टेशनचे उद्घाटन केले. याचे नाव पूर्वी हबीबगंज रेलवे स्टेशन होते आता त्याचे नामकरण करून राणी कमलापती स्टेशन असे ठेवण्यात आले आहे.Railway station Name: Prime Minister Modi inaugurates Rani Kamalapati railway station in Bhopal; Names of 26 railway stations changed
मोदी सरकारच्या कार्यकाळात तब्बल 26 रेल्वे स्टेशनचे नाव बदलण्यात आलेले आहे.
आतापर्यंत महत्त्वाच्या 10 स्टेशनची नावे बदलण्यात आली आहे.
यात प्रामुख्याने उत्तर प्रदेशातील पाच रेल्वे स्टेशनची नावे बदलण्यात आली आहेत.
यूपीमध्ये फैजाबाद रेल्वे स्टेशनचं नाव बदलून अयोध्या कॅंट असे ठेवण्यात आले आहे. मुगलसराय जंक्शनचे नाव दीनदयाल उपाध्याय जंक्शन केले आहे.
अलाहाबाद जंक्शनचे नाव बदलून प्रयागराज जंक्शन ठेवण्यात आले आहे.
याबरोबरच मंडुआडीह रेल्वे स्टेशनचं नाव बदलून बनारस रेल्वे स्टेशन ठेवण्यात आले आहे.
तर दांदूपुर रेल्वे स्टेशनचं नाव बदलून वराही देवी धाम रेल्वे स्टेशन असे बदलण्यात आले आहे.
कर्नाटकातील बेंगलोर रेल्वे स्टेशनचे नाव बदलून क्रांतीवीर संगोली रायन्ना रेल्वे स्टेशन केले आहे.
त्याचबरोबर गुलबर्गा रेल्वे स्टेशनचे नाव बदलून कलबुर्गी रेल्वे स्टेशन केले आहे.
महाराष्ट्रात ओशिवारा रेल्वे स्टेशनचं नाव बदलून राम मंदिर रेल्वे स्टेशन केले.
त्याच्याबरोबरच एलफिंस्टन रेल्वे स्टेशनचे नाव बदलून प्रभादेवी रेल्वे स्टेशन असे नाव देण्यात आले आहे.
भारतीय रेल्वे कोणत्याही रेल्वे स्टेशनच्या नाम करणात सहभागी होत नाही. राज्य सरकारच्या अधिकारात नाव बदलले जाते.अशावेळी राज्य सरकार केंद्रीय गृहमंत्रालय आणि नोडल मंत्रालयाकडे विनंती पाठवतात. येथून मंजुरी मिळाल्यानंतर रेल्वे स्थानकांची नावे बदलली जातात.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App