विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: रेल्वे मंत्रालयाने प्रवासी ट्रेन्सच्या सर्व डब्यांमध्ये क्लोज सर्कीट टेलिव्हिजन (सीसीटीव्ही) कॅमेरे लावण्यास मंजुरी दिली आहे. रेल्वेमधील गुन्हे रोखण्यासाठी, संशयित हालचालींचा तपास करण्यासाठी आणि सुरक्षेच्या कारणांचा विचार करून हा निर्णय घेतला आहे. ४१४१ डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आधीच लावण्यात आले आहेत.Rail travel will be safer, CCTV will be installed in all trains including locals
इलेक्ट्रीक मल्टिपल यूनिट आणि प्रवासी ट्रेन्समध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. ईएमयू आणि प्रवासी ट्रेन्समध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही लावले जात आहेत. देखरेख, गुन्ह्यांना प्रतिबंध करणं, खटल्यांची नोंदणी करणं, रेल्वे परिसरात तसेच धावत्या गाड्यांमध्ये त्यांचा तपास, कायदा व सुव्यवस्था राखणं आणि संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणं ही राज्य सरकारची घटनात्मक जबाबदारी आहे, त्याच्या सुरक्षेची जबाबदारी ही रेल्वे पोलिसांकडे आहे.
प्रवाशांचा रेल्वे प्रवास सुरक्षित करण्यासाठी आणि गुन्हेगारांवर बारीक नजर ठेवण्यासाठी, सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जात आहेत. यामुळे रेल्वे पोलीस आणि जिल्हा पोलिसांना गुन्हांची नोंदणी आणि तपास करण्यासाठी सहायक ठरणार आहे.रेल्वेच्या संपत्तीचे नुकसान करणाऱ्या असामाजिक तत्व आणि रेल्वेत गुन्हे करणाºयांना यामुळे पायबंद बसेल.
गुन्हेगारांच्या नियमित विश्लेषणाच्या आधारे अशा संवेदनशील क्षेत्रांची किंवा मार्गांची यादी तयार करणार आहे. या गुन्हेगारी ठिकाणांवर नजर ठेवण्यासाठी प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना देखील करण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App