रेल्वेच्या एसी – 3 कोचमध्ये 83 बर्थ; मोदी सरकारमुळे रेल्वेचा प्रवास अधिक सुखाचा

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून देशात नागरी सुविधा देण्याकडे कल वाढला आहे. याची प्रचिती रेल्वेसेवांचा विचार केल्यावर वारंवार जाणवते.Railway AC 83 berths in 3 coaches Rail travel more comfortable due to Modi government

आता तर रेल्वेच्या एसी – 3 मध्ये मोठे बदल केले आहेत. बर्थसंख्या 72 वरून 83 पर्यंत वाढविण्यात रेल्वे इंजिनिअरना यश आले आहे.त्यामुळे रेल्वेत 220 बर्थ आता वाढणार आहेत.गरीब रथ रेल्वेत 72 बर्थसंख्या एका एसी 3 कोचमध्ये होती. त्याचाच आधार घेऊन नवा कोच बनविला आहे. त्यामध्ये जागेचा वापर करून 83 बर्थ बसविले आहेत. त्यासाठी पार्टिशन जागा कमी केली आहे. येण्याजाण्याच्या जागेत थोडी कमी करून बर्थ संख्या वाढविण्याची किमया केली आहे.

परंतु, असे करताना प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली आहे. पूर्वी गरीब तरच डब्यात एका बाजूला तीन बर्थ होते. परंतु, आता तसे केलेले नाही. त्यात सुधारणा घडवून आणल्या आहेत. भविष्यात मेल आणि एक्स्प्रेस गाड्यात स्लीपर कोच ऐवजी असेच अधिक बर्थ असलेले कोच लावले जातील.

कापूरथला येथे हे कोच तयार केले असून त्याची चाचणी झाल्यावर त्याच्या निर्मितीला चालना दिली आहे. जागा कशी वाढली

 •  ट्रेनच्या सुरुवातीला बेडरोलसाठी स्टोअर असते. अन्न गरम करणे, गरम पाण्याची सोय करण्यासाठी स्विच बोर्ड केबीनेट असते ते स्विच बोर्ड केबीनेट आता डब्याच्या चेसीमध्ये हलीवले आहे.
 •  डब्याच्या पॅसेंजमधील जागा कमी केली.
 • दोन डब्यांच्या पार्टिशनचे मोठे भाग कमी करून ते सुटसुटीत केले.

प्रवाशांना अधिक सुविधा

 •  या कोचमध्ये जास्त वस्तू ठेवण्याची व्यवस्था आहे
 •  दिव्यांगांसाठी प्रशस्त प्रवेशद्वार असलेले टॉयलेट
 •  प्रत्येक बर्थसाठी एसी व्हेंट उपलब्ध आहेत.
 •  दोन साइट फोल्डिंग टेबल आणि बॉटल होल्डर
 •  मोबाइल फोन आणि मॅग्जीन होल्डर्स उपलब्ध
 • प्रत्येक बर्थवर वाचण्यासाठी लाइट
 •  मोबाइल चार्जिग पॉईंट
 •  मिडिल आणि अपर बर्थवर चढता यावे, यासाठी आकर्षक शिड्या बनविल्या आहेत

Railway AC 83 berths in 3 coaches Rail travel more comfortable due to Modi government

  Leave Your Comment

  Your email address will not be published.*