विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरी येथील हिंसाचारप्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांची केंद्रीय मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी या मागणीसाठी संयुक्त किसान मोर्चाने देशभर सहा तासांचे रेल रोको आंदोलन केले. देशातील ५० गाड्यांना याचा मोठा फटका बसला.Rail service disturbed in Punjab, Haryana
पंजाब, हरियानामध्ये या आंदोलनाची तीव्रता अधिक होती. या दोन्ही राज्यांत १३० ठिकाणांवर रेल्वे वाहतुकीचा खोळंबा झाला होता.रेल्वेची कोणतीही वित्तहानी न करता हे आंदोलन करण्यात यावे असे आवाहन किसान मोर्चाकडून करण्यात आले होते.
लखीपूमरमधील हिंसाचारात आठजणांचा मृत्यू झाला होता. रोहतक, पानिपत, कुरूक्षेत्र, कैथल, बहादूरगड, अंबाला, जालंधर, लुधियाना, चंडीगड, अमृतसर, जम्मू, मेरठ, गाझियाबाद, शामली, सहारनपूर आणि मुरादाबाद रेल्वे स्थानकांवर शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन केले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App