वृत्तसंस्था
नवी दिल्ली : Raihan Vadra Engagement काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी आणि उद्योगपती रॉबर्ट वाड्रा यांचा मुलगा रेहान वाड्राचा गर्लफ्रेंड अवीवा बेगसोबत साखरपुडा होत आहे. २५ वर्षीय रेहानने ७ वर्षांच्या मैत्रीनंतर दोन्ही कुटुंबांच्या उपस्थितीत अवीवाकडे लग्नाचा प्रस्ताव मांडला, जो तिने स्वीकारला. प्रियंका व अवीवाची आई नंदिता या मैत्रिणी आहेत. दोन्ही कुटुंबीयांसह काँग्रेस नेते राहुल गांधी मंगळवारी नवीन वर्ष साजरे करण्यासाठी रणथंबोरला पोहोचले. येथे बुधवारी साखरपुडा होऊ शकतो.Raihan Vadra Engagement
फोटोग्राफीची इतकी आवड की जिथे लूट झाली, तिथेच शूटसाठी गेला
रेहान वाड्रा याने दिल्ली, डेहराडून आणि लंडनमध्ये शिक्षण घेतले आहे. त्याला वाइल्ड लाइफ फोटोग्राफीची आवड असून तो व्हिज्युअल आर्टिस्टही आहे. तो ७ वर्षांचा असताना आई प्रियंका गांधी यांनी त्याच्या हातात कॅमेरा दिला होता. कडक सुरक्षेत असूनही त्याला ‘स्ट्रीट फोटोग्राफी’ आवडते. तो रस्त्यांवरील सामान्य लोक आणि त्यांच्या कथा कॅमेऱ्यात कैद करतो.Raihan Vadra Engagement
२०१७ मध्ये क्रिकेट खेळताना लेदर बॉल लागल्याने डाव्या डोळ्याला दुखापत झाली होती. २ वर्षे विश्रांतीनंतर रेहानने पुनरागमन केले. जेव्हाही रेहानला राजकारणात येण्याबाबत विचारले जाते, तेव्हा त्याचे उत्तर असते की, मला फक्त कलेच्या राजकारणात रस आहे. रेहानला फुटबॉलचीही आवड आहे. लंडनच्या युनिव्हर्सिटीत राजकारणाचे शिक्षण घेत असताना रेहानसोबत लूटमार झाली होती. रेहानने या घटनेलाही कलेशी जोडले. नंतर त्याने त्याच निर्जन रस्त्यावर जाऊन फोटोग्राफी केली होती.
अवीवा बेग ही देखील दिल्लीची रहिवासी आहे. तिचे शालेय शिक्षण दिल्लीच्या मॉडर्न स्कूलमधून झाले. त्यानंतर तिने ओपी जिंदल ग्लोबल युनिव्हर्सिटीतून पत्रकारितेत पदवी घेतली. ती व्यावसायिक फोटोग्राफर, प्रोड्यूसर व राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल खेळाडू राहिली आहे. ती ‘एटेलियर ११’ या प्रोडक्शन कंपनीची सहसंस्थापक आहे. ही कंपनी देशभरातील एजन्सी, अनेक ब्रँड्स आणि क्लाइंट्ससोबत काम करते. अवीवाचे वडीला इम्रान व्यावसायिक आहेत. आई नंदिता बेग या इंटिरिअर डिझायनर आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App