राहुल गांधींची फसलेली भारत जोडो न्याय यात्राच काँग्रेसच्या जाहीरनाम्याचे भांडवल; 5 पासून 25 पर्यंत गॅरेंट्यांचे बांधले “तोरण”!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : राहुल गांधींची फसलेली भारत जोडो न्याय यात्राच काँग्रेसच्या जाहीरनाम्याचे भांडवल; 5 पासून 25 पर्यंत गॅरेंट्यांचे बांधले “तोरण” असे आज नवी दिल्लीत घडले!! Rahul Gandhi’s failed Bharat Jodo Nyaya Yatra is the capital of the Congress manifesto

राहुल गांधींच्या फसलेल्या भारत जोडो न्याय यात्रेचे भांडवल करत काँग्रेसने आज लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये काँग्रेसने 5 पासून 25 पर्यंत गॅरेंट्याचे तोरण बांधले. राहुल गांधींचे भारत जोडून या यात्रा सुरुवातीला जरूर गाजली, पण नंतर टप्प्याटप्प्याने ती निष्प्रभ होत गेली. पण त्यांच्या यात्रेचा काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यासाठी उपयोग करून घेतला.
या जाहीरनाम्याविषयी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाषण केले. त्यामध्ये त्यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचेच सविस्तर वर्णन केले. राहुल गांधींनी या न्याय यात्रेदरम्यान ज्या मोठमोठ्या घोषणा केल्या त्याचेच रूपांतर काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात करून टाकले.

काँग्रेसचा 2024 च्या लोकसभा निवडणुकीतला जाहीरनामा हा देशाच्या राजकीय इतिहासात न्यायाचा दस्तऐवज म्हणून प्रसिद्ध होईल, असा दावा मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा 5 स्तंभांवर आधारित होती. राहुल गांधींनी या यात्रेत “युवा न्याय”, “किसान न्याय”, “नारी न्याय”, “श्रमिक न्याय” आणि “हिस्सेदारी न्याय” अशा घोषणा दिल्या होत्या. या 5 स्तंभांमधूनच काँग्रेसच्या 25 गॅरंट्या निघाले आहेत. या 25 ग्यारंट्यांमधून काँग्रेसने संपूर्ण देशातले सगळे लाभार्थी कव्हर केले आहेत, असा दावा मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला.

राहुल गांधींनी भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान जातनिहाय जनगणनेवर भर देऊन “जिसकी जितनी आबादी, उतनी उसकी हिस्सेदारी” अशी घोषणा दिली होती. प्रत्यक्षात हिंदुत्वाच्या राजकारणाला छेद देणारी ती जातीजातींमध्ये फूट पाडण्याची रणनीती होती. नेमके त्याच गोष्टीचे प्रतिबिंब आता काँग्रेसच्या जाहीरनाम्यात पडले असून “हिस्सेदारी न्याय” या नावाखाली जातीजातींमध्ये फूट पाडण्याचे पाडण्याचा अधिकृत दस्तऐवज काँग्रेसने जाहीर केल्याचे दिसून येत आहे.

Rahul Gandhi’s failed Bharat Jodo Nyaya Yatra is the capital of the Congress manifesto

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात