राहुल गांधींची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ पुन्हा स्थगित, जाणून घ्या कारण

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ असणाऱ्या वाराणसी मतदारसंघात आज राहुल गांधींची न्याय यात्रा सुरू होणार होती.


विशेष प्रतिनिधी

वाराणसी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सध्या भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे. या प्रवासात ते उत्तर प्रदेशच्या हद्दीत दाखल झाले आहेत. राहुल गांधी यांचा आज वाराणसी दौरा सुरू होणार होता, मात्र आता त्यांचा दौरा पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आला आहे.Rahul Gandhis Bharat Jodo Nyaya Yatra postponed again

काँग्रेस पक्षाचे नेते जयराम रमेश यांनी ही माहिती दिली आहे. जयराम रमेश यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर राहुल गांधींच्या वायनाड दौऱ्याची माहिती दिली आहे. राहुल गांधी उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातून परतीच्या प्रवासाला सुरुवात करतील असेही ते म्हणाले.



X वरील त्यांच्या पोस्टमध्ये जयराम रमेश यांनी लिहिले आहे की, ‘वायनाडमध्ये राहुल गांधींच्या उपस्थितीची नितांत गरज आहे. ते आज सायंकाळी ५ वाजता वाराणसीहून निघणार आहेत. भारत जोडो न्याय यात्रा उद्या 18 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता प्रयागराजमध्ये पुन्हा सुरू होईल.

राहुल गांधी यांना वायनाडला का पाठवले जात आहे, याची संपूर्ण माहिती अद्याप समोर आलेली नाही, मात्र त्यांच्या आजच्या दौऱ्यातील व्यत्यय हा काँग्रेससाठी मोठा धक्का आहे. कारण राहुल गांधी यांचा आज पंतप्रधान मोदींचा लोकसभा मतदारसंघ वाराणसी येथे दौरा होणार होता.

Rahul Gandhis Bharat Jodo Nyaya Yatra postponed again

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात