वृत्तसंस्था
नवी दिल्ली : Rahul Gandhi महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदार यादीत अनियमितता झाली असल्याचा आरोप लोकसभेतील काँग्रेसची विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केला आहे. या संदर्भात राहुल गांधी, उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. यामध्ये आम्हाला अनेक अनियमित आढळल्या असल्याचे यावेळी राहुल गांधी यांनी सांगितले. निवडणूक आयुक्त निवडण्याची पद्धत देखील सरकारने बदलली असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.Rahul Gandhi
या संदर्भात राहुल गांधी म्हणाले की, लोकसभेपूर्वी 32 लाख मते आणि विधानसभेपूर्वी 39 लाख मते जोडली गेली. 5 महिन्यांत 7 लाख नवीन मतदार जोडले गेले आहेत. आम्ही निवडणूक आयोगाला याची चौकशी करण्यास सांगितले. आम्ही मतदार यादी, नावे आणि पत्ते मागवले आहेत. त्यांची छायाचित्रेही द्यावीत अशी आमची मागणी आहे. आम्हाला लोकसभा आणि विधानसभेची मतदार यादी हवी आहे. अनेक मतदारांची नावेही हटवण्यात आली आहेत. ही दलित, अल्पसंख्याक मते आहेत. मी कोणतेही आरोप करत नाही, पण काहीतरी गडबड आहे का? असा आमचा प्रश्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मी संसदेतही माझ्या भाषणात हीच गोष्ट मांडली होती. 5 वर्षात जेवढे मतदार जोडले गेले त्यापेक्षा 5 महिन्यात जास्त मतदार जोडले गेल्याचे सांगण्यात आले. हिमाचलच्या मतदार यादी एवढे मतदार यात समाविष्ट केले आहेत. महाराष्ट्राची प्रौढ लोकसंख्या 9.54 कोटी आहे. तर निवडणूक आयोगाच्या मते 9.7 कोटी मतदार असल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
महाराष्ट्रात 9 कोटी 54 लाख लोकसंख्या असताना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आधी 39 लाख मतदान वाढले असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. पाच वर्षात 34 लाख मतदार वाढले आहेत. त्यामुळे आम्हाला नाव आणि पत्त्यासह मतदार यादी हवी असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राच्या पौढ लोकसंख्येपेक्षा मतदारांची संख्या जास्त असल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. पाच महिन्यात एवढे मतदार कसे वाढले? असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्रामध्ये आमची मतदानाची संख्या कमी झालेली नाही. लोकसभा निवडणुकीत आम्हाला जेवढी मते मिळाली तेवढीच मते आम्हाला विधानसभा निवडणुकीत देखील मिळाली आहेत. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीपर्यंत मतदारांची जी संख्या वाढली तेवढेच मते ही भारतीय जनता पक्षाची वाढली असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. राज्यात आमची मते कमी झालेली नसल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही यावेळी मारकडवाडीचा मुद्दा उपस्थित करत निवडणूक आयोगाच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आमच्या पक्षाचे आमदार उत्तम जानकर माळशिरस विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेत. त्यांनी आपल्या जेवढी मते मिळायला हवीत, तेवढी मते मिळाली नसल्याचा आरोप केला आहे. त्यांची निवडून येऊनही पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची इच्छा आहे. विशेषतः मनसेच्या एका उमेदवाराला त्याचे स्वतःचेही मत पडले नाही. अशा अनेक गंभीर गोष्टी या निवडणुकीत घडल्या आहेत. त्यामुळे अनेक नेत्यांनी व पक्षांनी ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. हा सर्व डेटा सार्वजनिक आहे. आम्ही या प्रकरणी केवळ निष्पक्षतेची मागणी करत आहोत, असे त्या म्हणाल्या.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App