फडणवीसांनी राहुल गांधींवर केला कव्हर फायरिंगचा आरोप; पण मग केजरीवालांनी काय केलं??

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी खासदार संजय राऊत आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातल्या मतदार याद्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल लागण्याच्या आदल्या दिवशी हा सगळा प्रकार घडल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर कव्हर फायरिंग केल्याचा आरोप केला. दिल्लीत काँग्रेसचा दारुण पराभव होणार असल्याचे त्यांना माहिती झाल्याने राहुल गांधींनी पराभव स्वीकारण्याऐवजी निवडणूक आयोगाच्या दिशेने कव्हर फायरिंग केले, असे फडणवीस म्हणाले.

पण एकीकडे महाराष्ट्रातल्या निकालावरून अशी महाविकास आघाडी आणि महायुती जुगलबंदी सुरू झाल्यावर दुसरीकडे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी दुसऱ्या दिशेने कव्हर फायरिंग केले.

निवडणूक आयोगाकडे त्यांनी दिल्लीतील प्रत्येक मतदान केंद्रावर झालेल्या मतदानाचे तपशील निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर टाकायला सांगितले. 17c फार नुसार ते आवश्यक आहे, असे ते म्हणाले. परंतु निवडणूक आयोगाने तसे केले नाही, असा आरोप केला. त्यामुळे प्रत्यक्ष निकालाच्या दिवशी म्हणजे उद्या आम आदमी पार्टीच बूथनिहाय मतदानाची माहिती जाहीर करणार आहे, असे ट्विट अरविंद केजरीवाल यांनी केले.

दिल्लीच्या वेगवेगळ्या एक्झिट पोलच्या निष्कर्षानुसार अरविंद केजरीवालांची सत्ता जाणार आहे. काँग्रेसला तर ० ते २ जागा मिळणार आहेत. त्यामुळे त्या दोन्ही पक्षांनी ते निष्कर्ष नाकारले आणि आज वेगवेगळ्या दिशांनी कव्हर फायरिंग केले.

AAP National Convenor Arvind Kejriwal tweets

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात