राहुल गांधीच्या शिवाजी पार्कवरील सभेला राज्य सरकारने अद्यापही प्रतिसाद दिला नाही. यामुळे त्यांच्या मुंबईतील सभेवर अजूनही प्रश्नचिन्ह आहे.Rahul Gandhi will hold a meeting at Shivaji Park on December 28 during his Mumbai tour; Petition filed in High Court for permission of meeting
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचं ‘मिशन मुंबई ‘ सुरू होत आहे.दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी हे २८ डिसेंबर रोजी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. २८ डिसेंबरला काँग्रेसच्या स्थापना दिनी राहुल गांधी शिवाजी पार्कवर सभा घेणार आहेत.
पण राहुल गांधीच्या शिवाजी पार्कवरील सभेला राज्य सरकारने अद्यापही प्रतिसाद दिला नाही. यामुळे त्यांच्या मुंबईतील सभेवर अजूनही प्रश्नचिन्ह आहे.तसेच राहुल गांधी यांची शिवाजी पार्कवरील ही पहिली सभा ठरणार आहे.
२०१८ साली राहुल गांधींना या मैदानावरील सभेसाठी परवानगी नाकारली होती. त्यामुळे राहुल गांधीची यंदा शिवाजी पार्कवर सभा होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राहुल गांधी यांच्या शिवाजी पार्कवरील सभेला परवानगी मिळावी यासाठी काँग्रेसने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या सभेच्या परवानगीसाठी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी सोमवारी यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेवर मंगळवारी तातडीची सुनावणी होणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App