जी २३ नेत्यांचा उल्लेखही नाही, राहुलजींनाच काँग्रेसचे अध्यक्ष बनविण्यावर एकमत; सप्टेंबर २०२२ मध्ये प्रक्रिया सुरू; अंबिका सोनींची माहिती

वृत्तसंस्था

नवी दिल्ली – काँग्रेस काही बिखरलेला परिवार नाही. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत जी २३ नेत्यांचा उल्लेख देखील झाला नाही. काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीची प्रक्रिया सप्टेंबर २०२२ मध्ये सुरू होईल. सर्व काँग्रेस नेत्यांना एकमताने राहुल गांधी यांनाच काँग्रेसचे अध्यक्ष बनवायचे आहे, असे प्रतिपादन काँग्रेसच्या नेत्या अंबिका सोनी यांनी केले आहेRahul Gandhi will become the party president or not is up to him. Everybody is of the opinion that Rahul Gandhi should become the party president

काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत उपस्थित राहुन बाहेर पडल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. जी २३ गटाच्या नेत्यांना सोनिया गांधी यांनी काही गोष्टी सुनावल्याच्या बातम्या बाहेर आल्या होत्या. त्या बद्दल विचारले असता अंबिका सोनी म्हणाल्या, मी प्रत्यक्ष बैठकीत उपस्थित होते. तिथे जी २३ नेत्यांचा उल्लेख देखील झाला नाही. सगळे नेते हजर होते. काँग्रेस हा गटातटांमध्ये विखूरलेला पक्ष नाही. आमची एकजूट कायम आहे. काँग्रेसच्या सर्व नेत्यांना एकमताने राहुल गांधी यांना काँग्रेसचे अध्यक्ष पुन्हा बनवायचे आहे. या निवडणूकीची प्रक्रिया सप्टेंबर २०२२ मध्ये सुरू होईल.

राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्ष बनावे, असे प्रत्येक काँग्रेस नेत्याचे मत आहे. कोणीही त्या मताला विरोध केला नाही. आता काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारायचे की नाही, हे स्वतः राहुल गांधी यांच्यावर अवलंबून आहे. पण काँग्रेसमध्ये त्याबद्दल एकमत आहे, याचाही पुनरूच्चार अंबिका सोनी यांनी केला आहे.

Rahul Gandhi will become the party president or not is up to him. Everybody is of the opinion that Rahul Gandhi should become the party president

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात