राहुल गांधींनी लोकसभेतला विरोधी पक्षनेता व्हावे, विस्तारित CWC मध्ये ठराव मंजूर; पद स्वीकारण्यापासून दूर राहत राहुल “सावध”!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत अचानकपणे काँग्रेससाठी मॅजिक ऑफ 99 झाल्यानंतर उत्साहात आलेल्या काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधींना लोकसभेतले विरोधी पक्षनेते पद स्वीकारण्याची वेळ घातली. विस्तारित काँग्रेस कार्यकर्णी मध्ये तसा ठराव देखील मंजूर केला. परंतु, आत्तापर्यंत कुठल्याही अधिकृत पदाच्या जबाबदारी पासून दूर राहिलेल्या राहुल गांधींनी लोकसभेतले विरोधी पक्ष नेतेपद स्वीकारण्यापासून सध्या तरी दूर राहत “सावध” पवित्रा घेतला.Rahul Gandhi to be Leader of Opposition in Lok Sabha, resolution passed in expanded CWC; Rahul stays away from accepting the post “caution”!!



लोकसभा निवडणुकीत मॅजिक ऑफ 99 घडल्याच्या पार्श्वभूमीवर आज अशोका हॉटेलमध्ये झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या विस्तारीत बैठकीत जबरदस्त उत्साह होता. कार्यकारिणीची बैठक सुरू होण्यापूर्वी आणि प्रत्यक्ष कार्यकारिणी मध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वावर सर्व नेत्यांनी स्तुतीसुमने उधळली. काँग्रेसच्या जागा वाढल्याचे सगळे श्रेय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि बाकीच्या काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला दिले. ते एक धाडसी आणि डोळ्यात डोळे घालून बोलणारे नेते आहेत, अशा शब्दांमध्ये सगळ्या नेत्यांनी राहुल गांधींची स्तुती केली. विस्तारित काँग्रेस कार्यकारिणीने राहुल गांधींनीच आता लोकसभेतले विरोधी पक्ष नेते पद स्वीकारावे, असा ठराव या बैठकीत मंजूर केला. मात्र काँग्रेस नेत्यांनी आग्रहपूर्वक मंजूर केलेल्या या ठरावावर राहुल गांधींनी लगेच कुठली प्रतिक्रिया दिली नाही. त्या उलट आपण विचारपूर्वक निर्णय घेऊ असे मोजक्या शब्दांमध्ये त्यांनी उत्तर दिले. यावेळी त्यांच्या शेजारी प्रियांका गांधी होत्या.

राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष असताना 2019 च्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने सपाटून मार खाल्ला नरेंद्र मोदींनी 2014 पासून ते आतापर्यंत सातत्याने गांधी परिवाराचा “शाही परिवार” म्हणून उल्लेख केला. काँग्रेस मधले कुठलेही सर्वोच्च पद हे फक्त गांधी परिवारालाच हवे असते संपूर्ण काँग्रेस पक्षच गांधी परिवार शरणागत आहे, अशी ते सातत्याने टीका करीत आले. ही टीका गांधी परिवाराला चिटकून बसली.

या पार्श्वभूमीवर गांधी परिवाराने स्वतःला काँग्रेसमधल्या सर्वोच्च पदापासून किंवा घटनात्मक पासून दूर ठेवले. राहुल गांधींनी तर कुठलेही अधिकृत पद स्वीकारण्याबद्दल धास्ती घेतली. त्यामुळे काँग्रेस कार्यकारिणीने ठराव करून देखील त्यांनी लोकसभेतले विरोधी पक्षनेते पद स्वीकारला लगेच होकार दिलेला नाही.

राहुल गांधींनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते पद स्वीकारले, तर ते घटनात्मक पद असेल. कारण त्याला कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा आहे. त्या पदाच्या विशिष्ट शक्ती आणि मर्यादाही आहेत. त्या सगळ्या राहुल गांधींना घटनात्मक चौकटीत राहून पाळाव्या लागतील. त्यावेळी त्यांच्यासमोर पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी असतील. या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी अद्याप तरी विरोधी पक्षनेते पद स्वीकारला होकार दिलेला नाही, ही बाब अधोरेखित करावी लागेल.

Rahul Gandhi to be Leader of Opposition in Lok Sabha, resolution passed in expanded CWC; Rahul stays away from accepting the post “caution”!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात