पवारांनी पंतप्रधान बनून अदानींचा बचाव केला, तर त्यांनाही प्रश्न विचारेन; राहुल गांधींनी मोदींबरोबरच पवारांनाही खेचले संशयाच्या फेऱ्यात!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : काँग्रेस खासदार राहुल गांधींनी अदानी घोटाळ्यातली रक्कम 20000 कोटींवरून 32000 कोटींवर नेली आहे. त्यासाठी त्यांनी लंडनच्या फायनान्शिअल टाइम्स वृत्तपत्राचा हवाला दिला आहे. लंडनच्या फायनान्शिअल टाइम्स मध्ये अदानींनी कोळशाच्या किमती संशयास्पदरित्या वाढविल्याचा रिपोर्ताज आज प्रसिद्ध झाला आहे. त्याचा हवाला देत राहुल गांधींनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानींना पत्रकार परिषदेत घेरले.

गौतम अदानींच्या कंपनीत 20000 कोटी रुपये कुणाचे आले??, असा प्रश्न मी काही महिन्यांपूर्वी विचारला होता, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यावर काहीही उत्तर दिले नाही. काँग्रेस आणि बाकीच्या विरोधकांनी त्यावर संयुक्त संसदीय समिती जेपीसी चौकशीची मागणी केली, पण सरकारने त्या मागणीलाही प्रतिसाद दिला नाही. आता मात्र त्या 20000 कोटींमध्ये 12000 कोटींची भर पडली आहे आणि एकूण रक्कम 32000 कोटी रुपये झाली आहे. अदानींची कंपनी इंडोनेशियातून कोळसा खरेदी करते आणि तो हिंदुस्थानात येईपर्यंत त्याची रक्कम दुप्पट होते आणि त्यातून प्रचंड वीजदर वाढ होते आणि अदानींच्या खिशात तो पैसा जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आदानींचा बचाव करतात म्हणून मी त्यांना प्रश्न विचारतो, असे राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत सांगितले.

*मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील गौतम अदानींचा बचाव करतात, मग तुम्ही त्यांना का नाही प्रश्न विचारत??, असा सवाल एका पत्रकाराने केला असता राहुल गांधी उदगारले, “शरद पवार पंतप्रधान नाहीत. नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत. शरद पवारांनी अदानींचा बचाव केला नाही. नरेंद्र मोदी अदानींचा बचाव करतात. उद्या शरद पवार जर पंतप्रधान झाले आणि त्यांनी अदानींचा बचाव केला तर मी त्यांनाही प्रश्न विचारेन!!”

राहुल गांधींनी ज्यावेळी गौतम अदानींच्या कंपनीत 20000 कोटी रुपये कुणाचे आले??, असा सवाल उपस्थित केला होता, त्यावेळी शरद पवारांनी अदानींच्याच मालकीच्या असलेल्या एनडीटीव्हीला मुलाखत देऊन अदानींचा बचाव केला होता. मात्र त्यावेळी आणि त्यानंतरही राहुल गांधींनी शरद पवारांवर कोणतेही प्रश्नचिन्ह उपस्थित केले नव्हते.

मात्र आज जेव्हा पत्रकार परिषदेत त्यांना शरद पवारांविषयी प्रश्न विचारला, तेव्हा त्यांनी वर नमूद केलेले उत्तर देऊन शरद पवारांना देखील आपण अदानी मुद्द्यावर घेरू शकतो, असे सूचित करून ठेवले. राहुल गांधींच्या या उत्तरानंतर महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीत मोठा भेद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गौतम अदानी मुद्द्यावर राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच शरद पवारांनाही संशयाच्या फेऱ्यात खेचले आहे.

Rahul Gandhi stretch sharad pawar in adani coal scam suspicion net!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub