
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारत – चीन सीमा तंट्यावर चर्चेसाठी बोलविण्यात आलेल्या संसदीय संरक्षण समितीच्या बैठकीतून काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या सदस्यांनी वॉक आउट केले, ही बातमी काल आली होती. पण त्याबाबतचा खुलासा या समितीचे अध्यक्ष जोएल ओराम यांनी केला आहे. Rahul Gandhi raised issues (LAC, China, Taliban) but didn’t walkout (Defence Committee meet). After discussions, he took permission to leave. He raised border situation issue & more but no agenda has been finalised: Jual Oram, Chairman, Parliamentary Standing Committee on Defence
राहुल गांधी यांनी वॉक आऊट केले नाही. त्यांनी या बैठकीत लाइन ऑफ अॅक्चुअल कंट्रोल (LAC), चीन, तालिबान हे मुद्दे जरूर उपस्थित केले. त्यावर काही चर्चा झाली. त्यानंतर ते परवानगी घेऊन बाहेर गेले. त्यांनी वॉक आऊट केले नाही. सीमा तंटा आणि बाकीचे मुद्दे त्यांनी उपस्थित केले पण त्याचा अजेंडा फायनल झाला नाही, असे जोएल ओराम यांनी स्पष्ट केले.
सीमा तंट्यावर संसदीय संरक्षण समितीची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत लाइन ऑफ अॅक्चुअल कंट्रोल (LAC) च्या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी काँग्रेस सदस्यांनी केली. मात्र समिती अध्यक्षांनी ही चर्चा करण्यास नकार दिल्याचे कारण देऊन संतापलेल्या काँग्रेस नेत्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला आणि राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली ते बाहेर पडले. एएनआय वृत्तसंस्थेने याची बातमी दिली होती. त्यावरच समितीचे अध्यक्ष जोएल ओराम यांनी वरील खुलासा केला आहे.
Rahul Gandhi raised issues (LAC, China, Taliban) but didn't walkout (Defence Committee meet). After discussions, he took permission to leave. He raised border situation issue & more but no agenda has been finalised: Jual Oram, Chairman, Parliamentary Standing Committee on Defence pic.twitter.com/BhYdBp0iUq
— ANI (@ANI) July 15, 2021
संरक्षण संसदीय समितीच्या बैठकीचा अजेंडा २९ जून रोजीच ठरला होता. मात्र राहुल गांधी अजेंड्यात नसलेल्या विषयावर चर्चा करत होते, अशी माहिती सूत्रांनी दिली होती. त्यामुळेच अध्यक्षांनी त्यांची विनंती फेटाळली असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले होते. मात्र, जोएल ओराम यांच्या खुलाशानंतर आता त्यावर पडदा पडला आहे.
मात्र, यापूर्वी राहुल गांधींनी डिसेंबर २०२० मध्येही संसदीय संरक्षण समितीच्या बैठकीवर बहिष्कार घातला होता. त्यावेळीही अजेंड्या व्यतिरिक्त पूर्व लडाखमध्ये देशाची काय तयारी आहे?, चीनबाबत रणनीती काय आहे?, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. पण तेव्हा समितीच्या बैठकीत या विषयाची चर्चा घेतली नाही म्हणून त्यांनी बहिष्कार घातला होता.