विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज आपल्या घराच्या प्रांगणातच चायनामेड ड्रोनशी खेळले. त्यांनी त्यातले तंत्रज्ञान भारतीयांना “शिकवले.” आपण काही नवेच इतरांना शिकवत आहोत असा आव त्यांनी आणला, पण ज्या ड्रोन तंत्रज्ञानाविषयी राहुल गांधींनी व्हिडिओद्वारे भाषण केले तेव्हा ते भारतातल्या हजारो ड्रोन दीदी असले ड्रोन शेती कामासाठी वापरतात हेच विसरून गेले!!
चायना मेड ड्रोनशी खेळतानाचे व्हिडिओ आणि फोटो राहुल गांधींनी आपल्या सोशल मीडिया हँडल्स वर शेअर केले. डीजेआय या चिनी कंपनीने बनवलेल्या ड्रोनची राहुल गांधींनी माहिती दिली. त्यामध्ये कॅमेरा कसा ऑपरेट होतो??, तो कुठे उपयोगी ठरतो??, युद्धतंत्रज्ञान आणि युद्धशास्त्र यामध्ये ड्रोनचा कसा उपयोग होईल??, याविषयी राहुल गांधींनी बरेच ज्ञान पाजले. पण ते केवळ भारतीयांचे “ज्ञानवर्धन” करून थांबले नाहीत, तर त्यांनी त्याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करून घेतली. पंतप्रधान मोदी ज्यावेळी टेलीप्रिंटर वर बघून भाषणे देतात, त्यावेळी आपले प्रतिस्पर्धी नवे नवे तंत्रज्ञान तयार करतात आणि त्याचा वापरही सुरू करतात, असा टोमणा राहुल गांधींनी मोदींना हाणला.
चिनी ड्रोन विषयक जाहिरात बाजी करताना राहुल गांधी एक गोष्ट विसरले, की हे ड्रोन तंत्रज्ञान भारतीय शेतकऱ्यांनी वापरायला कधीच सुरुवात केली आहे. किंबहुना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारने ड्रोन दीदी योजनेद्वारे आठ लाखांपर्यंतचे अनुदान देऊन हजारो महिलांना प्रशिक्षित करायलाही सुरुवात केली आहे. वेगवेगळी राज्य सरकारे त्यात पुढाकार घेत आहेत. त्यासंबंधीच्या शेकडो बातम्या माध्यमांनी दिल्या आहेत.
इतकेच काय पण डीआरडीओ संस्थेने ड्रोन आणि एआय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स याची उत्तम सांगड घालून जी उपकरणे बनवली, ती भारतीय लष्कराच्या आधीच वापरात आहेत. सागरी सीमा आणि जमिनीवरच्या सीमांवर त्यांचा दक्षता म्हणून उपयोगही सुरू आहे. पण राहुल गांधींच्या आजच्या ड्रोन विषयक भाषणामध्ये याचा साधा उल्लेखही नव्हता. किंबहुना भारताने द्रोण आणि या क्षेत्रात केलेल्या संशोधनाची त्यांना माहितीही नव्हती, हे दारूण वास्तव त्यांच्या व्हिडिओतून आणि फोटोंमधून समोर आले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App