कॉँग्रेसमधील जी-२३ या ज्येष्ठ नेत्यांच्या गटाची समजूत घालण्यासाठी आता कॉँग्रेसच्या सरचिटणिस प्रियंका गांधी यांनी पुढाकार घेतला आहे. या नेत्यांचा राहूल गांधी यांना विरोध असल्याने प्रियंका गांधी यांच्यावर त्यांची समजूत काढण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. कॉँग्रेमधून राहूल गांधी आऊट आणि प्रियंका गांधी इन झाले असल्याचे म्हटले जात आहेत.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कॉँग्रेसमधील जी-२३ या ज्येष्ठ नेत्यांच्या गटाची समजूत घालण्यासाठी आता कॉँग्रेसच्या सरचिटणिस प्रियंका गांधी यांनी पुढाकार घेतला आहे. या नेत्यांचा राहूल गांधी यांना विरोध असल्याने प्रियंका गांधी यांच्यावर त्यांची समजूत काढण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.Rahul Gandhi out, Priyanka in, took the initiative to settle domestic disputes
कॉँग्रेमधून राहूल गांधी आऊट आणि प्रियंका गांधी इन झाले असल्याचे म्हटले जात आहेत.या महिन्यात कॉंग्रेस कार्यकारी समिती आणि पक्षाच्या संसदीय पक्षाच्या तीन बैठका झाल्या पक्षात सुधारणा घडवून आणण्याची मागणी करताना
राहूल गांधी यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका करणारे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचेही मन वळवण्यात प्रियंका गांधी यांनी यश मिळविले आहे. पक्षाने कोविड कृतिगट स्थापन केला असून त्यात प्रियंका वाड्रासह गुलाम नबी आझाद यांचे नाव अग्रभागी होते.यामध्ये नाराज असलेल्या जी-२३ चे मुकुल वासनिक यांचाही समावेश करण्यात आला आहे.
विधानसभा निकालांच्या पार्श्वभूमीवर दुसरी समिती गठीत करण्यात आली असून त्यात मनीष तिवारी यांचा समावेश केला आहे. अन्य नाराज नेत्यांचे मन वळवण्याचाही प्रयत्न सुरू आहे.
काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत सोनिया गांधी यांनी जी -२३चे ज्येष्ठ सदस्य विवेक तन्खा यांचे उघडपणे कौतुक केले. कोविड संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी तन्खा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. बी.व्ही. श्रीनिवास यांनाही कोविड टास्क फोर्समध्ये स्थान देण्यात आले आहे.
प्रियंका गांधी यांनी स्वत:ला उत्तर प्रदेशपुरते मर्यादित ठेवले होते. उत्तर प्रदेशात त्यांची पूर्व विभागाच्या प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती पण पश्चिम विभागाचे प्रभारी ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे संपूर्ण राज्याची जबाबदारी प्रियंकाच्या खांद्यावर आहे.
उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडमधील २०२२ पर्यंतच्या विधासभा निवडणुकांपर्यंत सोनिया गांधी याच पूर्णवेळ अध्यक्ष म्हणून राहतील यावर पक्षात जवळपास सर्वांचे एकमत झाले आहे. राहूल गांधी यांना पक्षातूनच असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या आसपास राहणाºया चौकडीच्या कामकाजाबद्दल बहुतांश नेत्यांना आक्षेप असल्याने पक्षाध्यक्षांनी नाराज नेत्यांचे मन वळवण्याची जबाबदारी प्रियंका यांच्यावर सोपवली.जी -२३ च्या जम्मू बैठकीनंतर १० जनपथने बंडखोरीला गांभीयार्ने घेतले.
केरळ आणि आसाममधील निकालांमुळे राहुल यांना अध्यक्ष बनविण्याचा मुद्दाच मागे पडला आहे. गुलाम नबी आझाद यांना पुन्हा राज्यसभेवर पाठविण्याबरोबरच कपिल सिब्बल, शशी थरूर भूपिंदरसिंग हुडा आणि अन्य नाराजांनाही महत्त्वाची भूमिका देण्याची तयारी सुरू आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App