विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल केल्यानंतर विरोधकांनी त्यांना टक्के टोणपे दिले आहे. यामध्ये काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांना राजीनामा दिलेल्या मंत्र्यांचा आता कळवळा आला आहे.Rahul gandhi, Nana patole, sanjay raut targets PM modi over cabinet resuhffle
आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना राजीनामा द्यावा लागला, यावरून राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. मोदींनी आपली गैरमर्जी झालेले आरोग्यमंत्री बदलून नवीन आरोग्यमंत्री नेमले आहेत त्यामुळे आता कोरोना प्रतिबंधक लस घेण्याची गरज भासणार नाही, असा टोला राहुल गांधींनी लावला आहे.
मोदी बकरे हलाल करताहेत असे चित्र दाखवून काहींनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची तुलना देखील हलाल होण्याची वाट पाहात असलेल्या बकरीशी केली आहे.
डॉ. हर्षवर्धन आरोग्यमंत्री असताना त्यांच्यावर टीकास्त्र सोडण्याची एकही संधी राहुल गांधी सोडत नव्हते. पण आता त्यांना डॉ. हर्षवर्धन यांचा कळवळा आहे.
आता राहुलजीच मोदींना टक्के टोणपे द्यायला पुढे सरसावलेत म्हटल्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले कसे मागे राहतील?? त्यांनी नुसत्या मंत्र्यांना बदलून उपयोग नाही तर खुद्द मोदींना बदलले पाहिजे अशी टिपण्णी केली आहे.
शिवसेना खासदार संजय राऊतांचा नारायण राणे केंद्रीय मंत्री झाल्यावर तीळपापड झाला आहे. आता त्यांना प्रकाश जावडेकरांचा उमाळा आला आहे. जावडेकरांसारखा अनुभवी मंत्री पंतप्रधान मोदींनी गमावला आहे, अशी टिपण्णी संजय राऊतांनी केली आहे.
शिवसेनेला रोखायला जर नारायण राणेंना मंत्री केले असेल, तर हा अख्ख्या मंत्रिमंडळाचा अपमान आहे, असा जावईशोध संजय राऊतांनी लावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App