Rahul Gandhi : राहुल गांधींनी मिस इंडिया सौंदर्यवतींची जात काढल्यावर सर्वपक्षीयांकडून टीकेचा भडीमार!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा भलतीकडेच भरकटवून मिस इंडिया सौंदर्य स्पर्धेत कोणीच दलित, आदिवासी, ओबीसी सौंदर्यवती नसल्याचा मुद्दा काढला. त्यामुळे ते सर्वपक्षीय नेत्यांच्या टीकेचे लक्ष्य ठरले. अगदी सत्ताधारी भाजपच्या विरोधकांनी देखील राहुल गांधींना त्यांच्या अस्थानी मुद्द्यावरून टीकेचे लक्ष्य केले. Rahul gandhi miss india caste

जातनिहाय जनगणना केली पाहिजे त्यामुळे देशातल्या किती जातींची मुख्य प्रवाहात सहभागीता आहे हे समजेल हा मुद्दा राहुल गांधी काँग्रेसच्या प्रयागराज मधल्या मेळाव्यात मांडत होते परंतु मध्येच ते घसरले आणि मिस इंडिया सौंदर्य स्पर्धेत एकही सौंदर्यवती दलित ओबीसी, आदिवासी नसल्याचा मुद्दा मांडला. त्यामुळे मूळ जातनिहाय जनगणनेचा मुद्दा बाजूला पडला.

राहुल गांधींवर मायावती, प्रशांत किशोर, केंद्रीय मंत्री किरण रिजू यांनी टीकेचा भडीमार केला. काँग्रेसला दलितांचा खोटा कळवळा आहे. बाबासाहेब आंबेडकर आणि कांशीराम हयात असताना काँग्रेस नेत्यांनी सतत त्यांचा अपमान केला. मते मिळवण्यासाठी फक्त त्यांना दलितांच्या दारात जावे लागते. परंतु त्यांची राजवट असताना काँग्रेसने कधीच जातनिहाय जनगणना केली नाही, असे टीकास्त्र मायावतींनी सोडले.

बिहारमध्ये लालूप्रसाद यादव आणि नितीश कुमार यांच्या सरकारांना काँग्रेसने पाठिंबा दिला होता. त्यांनी तिथे जातनिहाय सर्वेक्षण केले. पण त्यातून त्यांनी गरिबांचे किती कल्याण केले??, काँग्रेस राजवट असणाऱ्या राज्यांमध्ये राहुल गांधींनी जातनिहाय सर्वेक्षण का केले नाही??, असे सवाल प्रशांत किशोर यांनी केले.

केंद्रीय मंत्री किरण रिजीजू राहुल गांधींना बालबुद्धी म्हणाले. बालबुद्धीने सौंदर्य स्पर्धेत देखील जातीचा विषय घुसवून मूळ मुद्द्याचे गांभीर्य घालवल्यासाठी टीका रिजीजू यांनी केली. राहुल गांधींना सिनेमात, खेळांमध्ये, सौंदर्य स्पर्धेमध्ये जात दिसू लागली. ते यातून सगळ्या जातींची खिल्ली उडवत आहेत. बालबुद्धीतून ते जाती जातींमध्ये फूट पाडण्याचा विषारी खेळ खेळत आहेत. याची किंमत काँग्रेसला चुकवावी लागेल, असे टीकास्त्र देखील किरण रिजीजू यांनी सोडले.

Rahul gandhi miss india caste

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात