“मोदींचे मुख्यमंत्री” अदानींसाठी काम करतात असे सांगून राहुल गांधींनी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांची “तासली”!!

विशेष प्रतिनिधी

रायपूर : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी मोठमोठ्या जाहीर भाषणांमध्ये फंम्बल मारण्यात पटाईत आहेत. अनेक ठिकाणी ते चुकीचे संदर्भ देऊन बोलतात एकाचे नाव घेऊन दुसऱ्या वरच टीका करतात, असे अनेकदा घडते. त्याचा फटका छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांना काँग्रेसच्या प्रचार सभेत बसला. आपल्या काँग्रेसच्याच मुख्यमंत्र्यांना “मोदींचा हा मुख्यमंत्री” अदानींसाठी काम करतो, असे सांगून राहुल गांधींनी त्यांची तासंपट्टी केली!! Rahul Gandhi fumbled again; he made bhupesh baghel “Modi’s Chief minister” working for adani

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राहुल गांधी रायपूरला आले. त्यांनी एका शेतकऱ्याच्या शेतात जाऊन डोक्याला मुंडासे बांधून हातात विळा घेऊन भात कापणी केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना देखील डोक्याला मुंडासे बांधायला लावून हातात विळा घ्यायला लावला. त्यामुळे दोघेही शेतकरी “दिसले.” राहुल गांधींनी या सगळ्याचे फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केले.

त्यानंतर राहुल गांधींनी काँग्रेसच्या प्रचार सभेला संबोधित केले. त्यावेळी त्यांच्या भाषणातले मुद्दे नेहमीचच मोदी – अदानी हेच होते. पण मोदी हे फक्त अदानींसाठी काम करत असल्याचा आरोप करताना राहुल गांधींची राहुल गांधींचे भाषण भरकटले आणि ते आपल्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्यांवर अदानींसाठी काम करत असल्याचा आरोप करून बसले.

मोदींवर आरोप करताना राहुल गांधी म्हणाले, “या देशातल्या जनतेला माहिती आहे, की दिवसातले 24 तास तुम्ही फक्त अदानींच्याच हिताची चिंता करता. अदानीच्या खिशात पैसा भरण्यासाठी तुम्ही कृषी कायदे आणले. तुम्ही आणि तुमची वेगवेगळी माणसे फक्त अदानींसाठीच काम करतात. इथले “तुमचे मुख्यमंत्री” पण अदानींसाठीच काम करतात. पण काँग्रेस मात्र छोट्या शेतकऱ्यांसाठी व्यवसायिकांसाठी आणि सामान्य माणसासाठी काम करते!!”

राहुल गांधींचे भाषण सुरू असताना त्यांनी “तुमचे इथले मुख्यमंत्री” असे म्हटल्याबरोबर मुख्यमंत्री भूपेश बघेल चांगलेच चमकले. त्यांची पुरती कुचंबणा झाली. कारण ते काँग्रेसचे मुख्यमंत्री आहेत आणि राहुल गांधी त्यांच्यावरच ते मोदींचा माणूस म्हणून ते अदानींसाठी काम करत असल्याचा आरोप करत होते. राहुल गांधींनी त्यासंदर्भात नंतर कोणता खुलासाही केला नाही. ते भाषण तसेच पुढे चालू ठेवत राहिले. त्यामुळे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना हातावर हात ठेवून राहुल गांधींकडे पाहात बसण्याशिवाय दुसरे काही करता आले नाही.

Rahul Gandhi fumbled again; he made bhupesh baghel “Modi’s Chief minister” working for adani

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात